- आरिफ आसिफ शेख
[ एम.एम.सी.जे., एम.ए. (हिंदी) ]
मनात आलेल्या विचारांना शब्दबद्ध करण्याचा छंद जडला. त्याचबरोबर वाचनाचीही फार आवड. ही आवड जोपासता-जोपासता शब्दांवर जडलेलं प्रेम कधी माझ्या लेखणीतून कागदावर उतरायला लागले., हे कळलेच नाही.
दिवसामागे दिवस सरत गेले अन बरे-वाईट अनुभव गाठीशी येऊ लागले. त्यातूनच मग मी वेगळे विश्व तयार केले आणि त्यातच राहायला, रमायला मला आवडू लागले. खान्देशातील जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अँण्ड जर्नालिझमची पद्व्युत्तर पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केली. तत्पश्चात मूळजी जेठा महाविद्यालयातून हिंदी विषयात पद्व्युत्तर पदवी संपादन केली.
कृषी क्षेत्रातील अग्रगण्य, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली जैन इरिगेशन कंपनीच्या मीडिया विभागात कार्यरत होतो. त्यापूर्वी दै. भास्कर (सन 2009) येथे तसेच दै. लोकमत समाचार, जळगाव येथे (सन 2011) रिर्पोटर म्हणून कार्य केले.
सन २०२२ मध्ये पुणे शहरातील प्रसिद्ध हिंदी दैनिक आज का आनंद या ठिकाणी उपसंपादक म्हणून कार्य केले. त्यानंतर एफिनिटी एक्सप्रेस इंडिया प्रा.लि. (खराडी, पुणे) या ठिकाणी उपसंपादक म्हणून काम केेले. तसेच महाराष्ट्रातील नंबर एकचे दैनिक लोकमत (पिंपरी-चिंचवड) या ठिकाणी उपसंपादक म्हणून काम केले आहे. सध्या बावधन-पुणे येथील आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या दैनिक प्रजा जागरूक याठिकाणी उपसंपादक म्हणून कार्यरत आहे.
आजवर विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. 'युवक तसेच युवकांच्या समस्या', 'सामाजिक', 'राजकीय', 'हिंदी-मराठी सिनेमा', 'चालू घडामोडी', 'आधुनिक जीवनशैली', 'कृषि-उद्योग', 'साहित्यिक-उद्योजकांविषयी' तसेच 'आर्थिक' अशा अनेक विषयांवर नऊशेहून अधिक मराठी-हिंदी भाषेतून लेख लिहिले असून ते स्थानिक, प्रादेशिक स्तरावर विविध दैनिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
विशेष :
- कृषी क्षेत्रातील विश्वस्तरीय जैन इरिगशन कंपनीची गृहपत्रिका-"भूमिपुत्र" चे हिंदी संस्करणाचे निरंतर कार्य.
समस्या नोंदवा