नाव - चंदन सुभाष विचारे.
शिक्षण - टि. वाय. बीकाॕम.
वास्तव्य - मुंबईमध्ये सायन-कोळीवाडा येथे.
नोकरी - गेटवे मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत "कस्टमर् सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह" या पदावर कार्यरत आहे.
लिखाणाची व भटकंतीची प्रचंड आवड आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील काही किल्ले ,पुरातन ऐतिहासिक मंदिरे, लेणी, जुने वाडे-गढी यांची भटकंती केली आहे.
प्रवासवर्णनपर लेख, प्रेम कथा , जुने वाडे - परिचित अपरिचित वास्तू, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, प्रबोधनपर विषयांवर लिखाण तसेच कविता व चारोळी लिहिल्या आहेत.
ऐतिहासिक माहिती संकलनाची आवड आहे. लेखन आणि भटकंती हे आवडते छंद आहेत .
दि.०७.०७.२०१७ रोजी 'सहाण' आणि दि. ०७.०७.२०१९ रोजी 'मयूरशिखा' नावाचा कथासंग्रह 'इ साहित्य प्रतिष्ठान' कडून प्रकाशित झाला आहे.
इतर प्रवासवर्णनपर, वास्तूविषयक लेख 'महाराष्ट्र टाइम्स' व 'सकाळ' या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत.
ऐतिहासिक वास्तू व वस्तू संवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.
थिंक महाराष्ट्र या वेब पोर्टलवर कल्याणचा भिडे वाडा, शिल्पकार श्री. भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय, प्रताप टिपरे-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली, शिवडीचा भट्टीवडा या विषयांवर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
प्रतिलिपीवर कथा ,कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत.
मराठीसृष्टी या वेब पोर्टलवर जैत रे जैत, छंद, खांदेरी उंदेरी जलदुर्गदर्शन मोहीम, मे महिन्याची सुट्टी हे लेख प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्राची शोधयात्रा या फेसबूक पेजवर काही लेख प्रसिध्द झाले आहेत - सप्तकोटेश्वर-नार्वे आणि संभाजी महाराज, ब्रिटीशकालीन मैलाचे दगड, मुंबईची म्हातारपाखाडी.
ठाणे - चेंदणी कोळीवाडा आणि गोविंदगड उर्फ गोवळकोट किल्ला चिपळूण येथील तोफ संवर्धन मोहिमेत सहभाग. चिपळूण येथील गोवळकोट आणि ठाणे चेंदणी कोळीवाडा येथील एकूण ११ तोफांचे संवर्धन केले आहे
मुंबईतल्या ब्रिटीशकालीन मैलाच्या दगडांचा इतिहास उजेडात आणल्याबद्द्ल किल्ले वसई मोहिम परिवार तर्फे सन्मान पत्र देऊन सन्मानित. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सदर दगडांच्या संवर्धनासाठी हेरिटेज कमिटी स्थापन.
पोएट्री मॅरेथॉन २०१९, ठाणे येथे सलग ८५ तासांच्या विश्वविक्रमी काव्य संमेलनात सहभागी.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा