मी पूनम अमेय तवकर(पाटील). मला लहानपणापासूनच वाचनाची अतिशय आवड. स्वतःबद्दल सांगावे असे फार काही नाही. कित्येक दिवस स्वतःचीच हरवलेली वाट शोधत होते आणि अचानक माझ्या जुन्या लिखाणाच्या छंदाची आठवण झाली. अलीकडेच पुन्हा स्वत: लिहण्याची सुरूवात केली. सुरूवात झाली ती कविता लिहण्यापासून आणि हळूहळू आता कथा,लेख,चारोळ्या यासुध्दा लिहीते. मला रहस्य आणि प्रेम यांवर लिहायला आवडते. वाचक माझ्या लिखाणाचा यथेच्छ उपभोग घ्यावा. सरतेशेवटी एवढीच एक इच्छा की लिखाणाला मनापासून दाद द्यावी व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात.