pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निसर्गाचे रंग टिपू दे

2

निसर्गाचे रंग टिपू दे जे घडायचय ते घडून जावू दे... त्या रिम-झिम पडणाऱ्या पावसाचे फुलांवर बागडणाऱ्या त्या इवल्याश्या फुलपाखरांचे रंग टिपू दे.... स्वच्छ निळ्या नभातले इंद्रधनूचे  ते रंग नयनी उमटू ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Shinde Bhagyashri

लेखिका-भाग्यश्री महादेव शिंदे आपेगांवकर, ता. अंबेजोगाई जि.बीड,(माहेर)शिक्षण-बी.ए.डि.टी.एड.शिक्षिका..छंद-नाट्य लेखन,काव्य लेखन,चारोळी,पेंटिंग,कथा लेखन.. कायम पत्ता-,,भाग्यश्री काकासाहेब मोरे,रा. किल्लेधारूर,ता.धारूर,जि.बीड .( सासर )...भाग्यश्री शिंदे आपेगांवकर या नावानेच काव्यलेखन,साहित्यलेखन. मला लहानपणापासूनच काव्य,नाट्यलेखनाची आवड आहे, मी आजपर्यंत पाचशेते सहाशे कविता लिहिल्या आहेत.सामाजीक समस्यांवर आधारीत विविध नाट्य,व कविता लिहिल्या आहेत. वर्तमान पञामधे माझ्या अनेक कविता प्रकाशीत झाल्या आहेत.त्यामध्ये स्ञीभ्रूनहत्या,हूंडाबळी,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,व्यथा, त्यांच्या समस्या,स्ञीयांवरील अत्याचार,भ्रष्टाचार,स्ञीयांच्या शौर्यावर आईच्या वात्सल्यावर आधारीत,अंधश्रद्धा,मुलगा-मुलगी भेदभाव,केरोनानं जनसामान्यांच विस्कळीत झालेलं जनजीवन,विद्यार्थ्यांच शालेय नूकसान,गरीबांचे हाल, महाराष्ट्राच्या मातीसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या विरांच्या शौर्याच्या कविता ,निसर्ग कविता इ.दि.विषयांवर मी कथा ,काव्य,नाट्य लेखन केले आहे.लवकरच प्रतिलीपी च्या माध्यमातून वेळात वेळ काढून मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन. मी अंधश्रद्धा, स्ञीभ्रूनहत्या,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,हूंडाबळीवर अनेक नाटकं लिहिली आहेत, शालेय तसेच गाव पातळीवर ती सादरही झाली आहेत. वंशाचा दिवा,आणि प्रेमा तूझा रंग कसा?या दोन कथा मी प्रतिलीपीवर सादर केल्या आहेत. प्रतिलीपीवर मी कविता मँरेथाँन या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 115 कविता सादर केल्या आहेत. मला आशा आहे की रसीक वाचकांना,समीक्षकांना त्या नक्की आवडतील. लिहिताना काही चूका झाल्या असतील तर दिलगीरी व्यक्त करते. मी आपली क्षमस्व आहे. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. खंबीर बनायला शिकवते.सुख आणि दु:ख माणसाचा आहार आहे.दु:ख पचवत आनंदानं जगणं यातच खरा जिवनाचा सार आहे... जीवन एक संघर्ष आहे.... ************* थोडसं वयक्तीक:-आम्ही मुळांत पाच बहिणीच भाऊ नाही, वडिल शेतकरीच, वै.ह.भ.प.मेघराज महाराज आपेगांवकर ज्यांनी आम्हां लहान,थोरांपासून व्रूद्धांपर्यंत श्री भग्वद्गीता शिकवली,अशा पावन मातीत,वारकरी,माळकरी कुटूंबात माझा जन्म झाला..शेती सावकारान लुबाडलेली असताना,घरची आर्थिक परीस्थीती बेताची असताना हाडाचं पाणी करून,दिवस राञ काबाड कष्ट करून,वेळप्रसंगी गळ्यातलं मंगळसुञही आमच्या शिक्षणासाठी विकणारी माझी आई, वंशाला दिवा हवा या खुळचट सामाजीक बुरसटलेल्या विचारांवर न चलता,कधीही मुलगा-मुलगीअसा भेदभाव न करता,मुलांप्रमाणे आम्हाला वाढवणाऱ्या माझ्या तिर्थ स्वरूप आई वडिलांच्या चरणी माझं हे पूर्ण साहित्य अर्पण.आई वडिलांनी जीवनात आम्हाला मुलगा समजून जो मोठेपणा मान दिला,कदाचित यांमुळेच मी कवयीञी/लेखीका झाले असावे,असं मला वाटतं... अहमद नगर येथे 2017साली झालेल्या शब्दगंध साहित्य संम्मेलनामधे माझी आईच्या प्रेमावर आधारीत वात्सल्य या कवितेची निवड झाली. सन्मान व मानचिन्ह देवून गौरव.बहर या काव्यसंग्रहात माझी वात्सल्य कविता प्रकाशीत करण्यात आली आहे.प्रतिलीपीवर वात्सल्य ही कविता 'माय'या नावाने प्रतिलीपी सा. सम्मेलन यामध्ये सादर केली आहे....या व्यस्त जीवनातून,संसार,प्रपंचातून वेळात वेळ काढून मी माझे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझे साहित्य सादर केले आहे..करत आहे...आणि पून्हा एकदा प्रतिलीपी सा.मंचाचे मनपूर्वक आभार ज्यांनी हे सुंदर साहित्यमंच आम्हा लेखकांसीठी उभं केलं.....लिखानाच्या ओघात काही चूका झाल्या असतील तर,मी आपली क्षमस्व आहे...कोणाच्या भावना दूखावण्याचा असा कुठलाही माझ्या लिखाणामागचा उद्देश नाही... सुचना: कथा,कवितेचा कुठलाही भाग,लेखीकेच्या परवानगीशिवाय इतर कुठेही प्रकाशीत करू नये.सर्व हक्क लेखीकेच्यास्वाधीन.. .....धन्यवाद..... लेखीका-सौ.भाग्यश्री आपेगांवकर.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.
  • author
    तुमचे रेटिंग

  • साहित्य रचनावर काही टिप्पणी नाही.