नमस्कार, मी किर्ती अविनाश नाटेकर. मला वाचनाची आवड तर आहेच परंतु, लिखाणाची आवड सुद्धा मी जोपासत आहे. माझे विचार, मला आलेला अनुभव हाच तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवणे माझा उद्देश.
जगात मुखवटे घेऊन वावरणारी कितीतरी माणसं आपल्याला भेटतात.परंतु जे मन आहे ते कधीच मुखवटा घेऊन वावरत नाही.ते अमृताप्रमाने पवित्र आणि शुध्द असतं.आयुष्यात नेहमीच हसत खेळत आनंदी राहा.आयुष्य आपली साथ कधी सोडेल कोणास ठाऊक?लिखाणाची आणि वाचनाची आवड जोपासली पाहिजे.कारण वाचनातून आपण खूप काही शिकतो तर लिखाणातून आपण कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाचा परत शोध घेत असतो.