कृपया तुमची आवडती भाषा निवडा
होम
श्रेणी
लिहा
साइन इन
तुझ्या ठायी.. तुझ्या ठायीं शिवाच्या आलयाचा नाद का येई ? की माझ्या प्राक्तनाला लाभलेला वाव होता तो ! तुझे सूर अंतरी शिरतां .. मी भाम्बावून का जातो ? तुझ्या आरक्त कांती जास्वंदी घाव होता तो ! ...
बाहेर रखरखीत उन्हे असताना.. मनात आभाळाचे करडे मोहक रंग उतरून आले तर.... खूप दिवसांच हरवलेलं.. काहीतरी अचानक सापडले तर जीव घुसमटत असतानाच.. धीर एकवटुन...एकदा मनात डोकावले तर. डोळे बंद झाले तर... श्वास संगीत झाले तर... मौनात समाधी लागल्या लागल्या कुठुनतरी ओल्या मातीचा , शुभ्र मोगऱ्याचा दरवळ आला तर.. रंध्रे रंध्रे पुलकित होऊन एखादे जूनेच गीत..भाव लेऊन कानात रुंजी घालत असेल तर.. काहीच बोलावसं वाटतं नसेल.. आणि फक्त आहे त्या क्षणांशी एकरूप होणे जास्त आनंददायी आणि हवेहवेसे वाटत असेल तर.. हे जग जादूभरल्या गोष्टींनी चालत असते त्यातलीच एखादी जादू आपल्या मनावर फिरली तर... ह्यातच तर अलौकिक शक्ती आहे.. आहे त्या स्थितीचा...मनावर कुठलाही परिणाम न करून घेता जगात टिकून राहता येत असेल तर... तुम्ही सर्वात सुंदर आहात. देह..वाचा..या जाणिवांपलीकडे अस्तित्वात आहात.... हे बुद्धितून मनात प्रवेश करत पेशीपेशीत भिनायला लागले तर.. ही आलेली धुंदी..प्रत्यक्ष अनुभवत असताना... एक गोष्ट सारखी जाणवत राहिली.. मी देहापलीकडे निरोगी..ताजी आणि नुकतीच उमलती आहे... तर तर... आपल्या आसपास असणाऱ्या कैक सुखांचा अचानक साक्षात्कार होतो. हसायला..जगायला..आणि...रुणझुणायला काय लागत असते एवढे ? डॉ. प्रेरणा

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा