फार कष्टाने मी सर्व पायऱ्या उतरून लगेच जे माझे कपडे मी हातामध्ये आणले होते ते सर्व घेऊन बाथरूममध्ये गेले पाण्याची बादली भरायला लावली आणि शांतपणे डोकं धरून खाली बसले , दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन त्यामध्ये डोकं घालून मी हमसून हमसून रडायला लागली , तेव्हाही मी एवढी काळजी घेत होते की माझा रडायचा आवाज बाहेर जाऊ नये जेणेकरून पुन्हा मला कोणी काही बोलू नये .असे पाचच मिनिट झाले होते की बाथरूमचा दरवाजा सासूबाईंनी वाजवला “ झाल का किती वेळ ? आम्हाला तर कधी एवढा वेळ लागायचा नाही बाई ," अस आवाज देऊन गेल्या ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा