pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तू अशी जवळी राहा.....

4.5
140932

लग्नाच्या पहिल्या रात्री मीरा नटून थटून इंद्रनीलची वाट बघत होती ..... खरं म्हणजे तिला बघायला आला तीच पहिली आणि शेवटची भेट ..... तिने नीट बघितलंही नव्हतं ....पण सर्वजण म्हणायचे मुलीने नशीब काढलं ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
( प्रणाली देशमुख )

प्रिय वाचक मी प्रणाली देशमुख .... थोडा परिचय ... 1लोकमत मैत्र पुरवणी , ऑक्सिजन पुरवणी मध्ये , सकाळ युवा , सकाळ सकाळ टुडे ,मनमोराचा पिसारा पुरवणीत लेख , देशोन्न विरंगुळा पुरवणी , अशा अनेक वृत्तपत्रासाठी सामाजिक , कौटुंबिक 2001 पासून 2021 पर्यंत लेख कविता लिखाण प्रकाशित झालय . 2) विविध दिवाळी अंकात कथा प्रकाशित .हृदय स्पंदन , शब्दकार , नाती , अशा अनेक मासिकात कथा लेख प्रकाशित 3) मराठी सिनेमा कलाकार सुबोध भावे यांनी " पृथ्वीराज संयोगिता " कथेचं अभिवाचन केलंय . 4)इंडियन भारत लिखाण स्पर्धेत जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे , अरविंद जगताप , यांनी महाराष्ट्रातून 25 विजेते निवडले ,त्यामध्ये प्रणाली देशमुख यांचा " माझ्या गावातील कलंदर व्यक्तिमत्व ह्या लेखाची निवड झाली . पुण्याच्या पत्रकार भवनात सन्मान करण्यात आला . 5) अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक ( कुसुमाग्रज नगरी )2021 ला निमंत्रितांच्या कवी कट्ट्यासाठी आमंत्रित करण्यात आलं . 6) स्थानिक कविसंमेलनात सक्रिय सहभाग . 7) कलाजागर संस्थेतर्फे 2021 चा कविरत्न पुरस्कार जाहीर . 8) मानवसेवा संघातर्फे सावित्रीबाई स्त्रीभूषण पुरस्कार प्राप्त 9) प्रतिलिपी मराठी महाकथा स्पर्धेत चाळिशीनंतरच प्रेम कथेचा पहिला क्रमांक आला 30000 हजार रोख बक्षीस मिळालं . 10) प्रतिलिपी मराठी प्रेम कथा स्पर्धेत " तू अशी जवळी राहा " कथेचा पहिला क्रमांक 10000 रु धनराशी . 11) प्रतिलिपी मराठी भयकथा स्पर्धेत ' भुताटकी 'कथेला चौथा क्रमांक मिळाला रोख 50000 धनराशी मिळाली . 12) प्रतिलिपी मराठी सिनेरंग कथास्पर्धेत विवाह कथेचा पहिलं पारितोषिक मिळालं 13) प्रतिलिपी मराठी कथा स्पर्धा मध्ये विश्वास ह्या कथेला दुसरं पारितोषिक मिळालं . 14) 2020 प्रतिलिपी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित . आईला लिखाण खूप आवडायचं ....तिची कामं आटोपली कि .... ती अगदी सहज बंगळीत बसून तिथल्या तिथे कविता रचायची आणि आम्ही भावंडं तिच्या पाठोपाठ म्हणायचो .... कदाचित तिच्यामुळे मी पण लिहायला लागले ....हा वारसा तिच्याकडूनच आलाय ....इयत्ता चौथीत असतांना पहिली कविता लिहली ....मग माझी आवड आपोआप वृद्धिंगत झाली ....शाळेत निबंध स्पर्धेत माझं बक्षीस अगदी हक्काचं असायचं .लोकमत मधील मैत्र या पुरवणीत बरेच लेख प्रसिद्ध झालेत ....युवा सकाळ ,विरंगुळा या सकाळ आणि देशोन्नती मधील पुरवण्यातही लिखाण प्रकाशित झाले आहे .माझं शिक्षण एम .ए .बी .एड .वाचनाची आणि गाण्याची आवड ...आवड म्हणता येणार नाही .इट्स माय पॅशन .....कॉलेजमध्ये असताना अभिनयही करून बघितला .....एक दोन एकांकिकाही लिहल्या .... जीवनातील अनुभवातून ....सहज सुचलेल्या मनाला भिडणाऱ्या कथा किंवा कविता .....आपल्याच जीवनाचा भाग असतात .जीवन हे कडू गोड अनुभवातून .....रुचकर बनतं .....येणाऱ्या परिस्थितीचा कसा सामना करायचा हे नकळत समजावून जातं ......येणारं सुखदुःख अलगद वेचायचं असतं " लाईफ हे असच असतं " [email protected] प्रणाली ~

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vandana Bhore
    14 अप्रैल 2019
    " तु अशी जवळी रहा "... नववधूने रंगविलेले स्वप्न उराशी बाळगून , ती सासरचे माप ओलांडते.... आणि पहिल्याच रात्री तिच्या आयुष्याचा जोडीदार म्हणतो , की माझे अजुन कुणावर तरी प्रेम आहे...काय वेडी अवस्था , वेड्या जिवाची...पाहिलेले स्वप्न ...भाव अंतरी उमलत होते , परी मनोगत मुकेच होते....तो मला जवळ घेईल ... माझं नखशिखांत सौंदर्य बघुन तो मोहरुन जाईल .. रात्रीच्या गर्भात तो माझी काया प्राषण करेल आणि मी त्या पुढ्यात असेल आनंदाच्या लहरीत मनसोक्त विहार करतांना... असंख्य किती तरी स्वप्न.... आणि एका क्षणात , एका शब्दात उध्वस्त झाली ... अगं मिरा माझं , दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे... आणि स्वप्नाचा मनोरा एका क्षणात जमिनदोस्त झाला.... किती घालमेल या जिवाची...भर ग्रिष्मात डोळ्यांतुन मृगाचा पाऊस कोसळू लागला.... पण तरीही वेडी आशा , वेड्या जिवाची ... करणार मी प्रतिक्षा .... माझं प्रेम , माझी तपश्चर्या , माझा विश्वास परत आणणार एक दिवस माझ्या जोडीदाराला माझ्या जीवनात.... आणि हा एकदिवस उजाडला सुध्दा ..‌.. आणि मग मात्र मिरा गुनगुनू लागली ..."" आज चांदणे उन्हात हसले तुझ्या मुळे , स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्या मुळे "" .... आणि मिरा इंद्रनिल मिठीत सामावली....!!
  • author
    Haribhau Ghundare
    02 मार्च 2019
    खुपच सुंदर कथा आहे. एक मात्र खरे आहे माणुस जवळ असला की त्याची किंमत कळत नाही हेच खरे. लेखक म्हणून आपल्याला खुप खुप धन्यवाद.
  • author
    Vimal Sandhanshiv
    26 मई 2019
    मिराने स्वतावर संयम ठेवला होता आणि तिची सासू सुध्दा तिच्या बाजूने होती आणि खर म्हणजे त्या मुलीचे दुसऱ्याशी असलेले संबध त्याच्या समोर आले आणि नंतर त्याला आपल्या बायकोचे प्रेम कीती आहे हे लक्षात आले व सर्व काही नीट झाले .