pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

प्रतिक्षा

4.6
5448

साऱ्या जगाचं दु:ख पाहून सिध्दार्थनी विद्रोह केला. सर्वसंगपरित्याग करून अरण्यात निघून गेले ते. मुक्तीच्या मार्गावर चालतानां त्यांनां ज्ञानप्राप्ती झाली. बुध्दांची ही कथा तर सारेच जाणतात.पण ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
दीपा देशपांडे

टीम प्रतिलीपी आणि प्रिय वाचक, मनःपुर्वक आभार. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं प्रोत्साहन आणि तुमचं मार्गदर्शन या साऱ्यांमुळेच साध्य झालेली प्रतीलीपिवरील यशस्वी वाटचाल: नवदुर्गा स्पर्धा टॉप 5 मध्ये मानाचे स्थान. बाल रंग स्पर्धा कविता तृतीय क्रमांक. म्हणींच्या दुनियेत टॉप 50 मध्ये 37 वे मनाचे स्थान. कालचक्र स्पर्धेत प्रथम क्रमांक. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आपले प्रेम असेच वृध्दींगत व्हावे ही विनंती.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Alka Mayekar
    13 মে 2020
    माझी मेहेकती फुलबाग ... ! " आंटी, मैं मेहेकको यहाँ धूप में रखू ?" शेजारची रूपसोना एका हातात दुपटं आणि एका हातात मेहेकला घेऊन उभी होती.सकाळी साडेसात ते आठपर्यंत आमच्या दारात छान कोवळं ऊन खिडकीतून आलेलं असतं. रूपसोनाला तिच्या सहा महिन्याच्या तान्ह्या लेकीला त्या कोवळ्या ऊन्हाचा खुराक द्यायचा होता.ती माझी परवानगी मागत होती. हातातला पेपर बाजुला करीत मी बघितला.खिडकीतलं कोवळं ऊन आणि तिच्या कडेवर कोवळं बाळहसू. मला आनंद झाला. " अरी,हां.शौकसे रूपसोना.जरूर रखो यहाँ मेहेकको.मैं हूँ यहाँ.तू कर ले अपना काम." तिने हसून दुपटं अंथरलं.ते साखरबोचकं त्यावर ठेवलं.मेहेक हातपाय उडवत मजेत उन्हात हूं हूं करत खेळू लागली.ते मेहेकचं आमच्या घरातलं पहिलं पाऊल... आणि मग रोजच मेहेकला तिची अम्मी माझ्यावर सोपवू लागली. मी खुषीनेच ही जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला अर्ध्या तासात ऊन गेलं की अम्मी किंवा अब्बू येऊन मला 'थँक्यू हां' आंटी म्हणत मेहेकला उचलून नेत असत.तो पर्यंत मीही मेहेकच्या बाळलीला पाहात मोबाईल, पेपर विसरून तिथेच बसलेली असे.हे कुटुंब नुकतंच आमच्या शेजाराला रहायला आलं होतं.त्यांना एक मुलगी आहे याचीच मला कोण अपूर्वाई ! मात्र नुकत्याच ओळखीवर हसणं, बाळाच्या गालाला हात लावणं इतपतच जवळीक होती. पण ऊन्हाच्या निमित्ताने मेहेकचा माझ्या घरातला वावर सुरू झाला. आता मी साडेसात वाजण्याची वाट बघू लागले.शेजारच्या दाराची कडी काढण्याचा आवाज कधी येतो याची चाहूल घेऊ लागले. मेहेकला घेऊन रूपसोना किंवा हुसेन कोणीही यायचं.ती आता मला ओळखू लागली होती. दारात येताच अम्मी अब्बूकडून झेप घेऊन माझ्याकडे येऊ लागली होती. पुढचा अर्धा तास आमच्या घरात तिचे हुंकार आणि माझे बोबडे खेळणबोल यांची नुसती धमाल उडायची. गुडिया रानी कैसी है? गुलाबफूल जैसी है... या माझ्या गाण्यावर ती बोळकं पसरून गोड हसायची.हातपाय जोरात उडवायची.आमच्या घरात तिच्यासाठी खेळणं काहीच नव्हतं.नातवंडंच शाळा काॕलेजातली.त्यातनं आम्ही दोघंच नववृद्ध घरात.मग मी एका निळ्या डबीत आठदहा वाटाणे घातले आणि झाला की खुळखुळा तयार ! मेहेक त्या डबीशी मन लावून खेळायची.ती घरंगळत गेली की आणून द्यायचं काम मला करावं लागे.आमच्या या खेळात तासभर सहज निघून जायचा.तो पर्यंत रूपसोनाने चार कामं भराभर उरकून घेतलेली असत. मेहेकला मोठा भाऊ आहे.रिझवान. तो शाळेत जातो.स्वारी दुसरीत आहे.घरी आला की त्याच्या जीवाला झेपेल असं तो आपल्या बहिणीला छान सांभाळतो. हे कुटुंब पश्चिम बंगालमधल्या एका खेड्यातून कोकणात पोटामागे आलं आहे.हुसेन सोनारपेढीवरचा हरहुन्नरी कारागीर आहे. त्याच्या हातच्या नकसकामाने सोन्याला नवनवीन रूपं मिळतात.बिबीचं नाव 'रूपसोना'ठेवण्यात त्याची रसिकता दिसतेच. रूपसोनाला मी आणि मला ती अशा सांगातिणी मिळाल्यात.गाव रिश्तेदार सोडून आलेल्या या लेकुरवाळीला आईच्या, सासूमाँ च्या आठवणीचे कढ आले की ते मोकळे करायला माझ्याकडे येऊ लागली.लहानग्या मेहेकला ट्रीपल पोलिओचे डोस झाल्यावर आलेला ताप उतरेपर्यंत मीही तिच्याबरोबरीने जागले याची तिला कोण अपूर्वाई वाटली ! मी रिझवान आणि मेहेकची आजीच झाले. मेहेक आता दिसामासाने मोठी होत होती. तिचं पालथं पडणं, तिचं पोटावर सरकणं, घोडा करणं सगळं माझ्यासमोरच होत होतं.आता मेहेकला माझ्या घरी यायला ऊन्हाचं निमित्त नव्हतं.ती कधीही इकडे येण्यासाठी बोट दाखवायची. माझं लेखन, वाचन सगळ्याचा वेग मंदावला.मला मेहेकचा विलक्षण लळा लागला.तिलाही माझा लागला हे विशेष. मॕडम आता माझ्यावर हक्क दाखवू लागल्या.ती आल्यावर मी हातातली कामं टाकून घेतलंच पाहिजे.इथे इथे बस रे मोरा, डोल मैना डोलाची या बाळगाण्यांची आवर्तनं झालीच पाहिजेत... माझं दुर्लक्ष होता उपयोगाचं नाही.लगेच माझ्या मांडीवर उभं राहून माझ्या झिंज्या उपटायला आणि," अॕ... वा..वॕ..आsss ऊ" अशा लिपीत न मांडता येणा-या भाषेत मला जाब विचारणं सुरू व्हायला लागलं. पोर मोठी गोड आहे. लाघवीही तितकीच आहे.माझ्या घरीच तिचं राहणं जास्त होऊ लागलं.तिचं शू शी, बुडबुड गंगे अंघोळ, तीटपावडर सगळं आजीकडूनच करून घ्यायचं असायचं.तिच्या कपड्यांचे दोन तीन जोड माझ्याकडेच वाळताना दिसायला लागले.आता फरशी लख्ख ठेवायची निकड भासू लागली.मेहेकला रांगताना घर अपुरं पडायला लागलं.फरशीवरचं काहीही इवल्याशा चिमुटीत धरायची खटपट सुरू झाली.माझं काम वाढलं फरशी पुसण्यासाठी मी चक्क माॕप विकत आणला. मऊ खिचडी, खीर,कुस्करलेला उकडा बटाटा हे खाद्यपदार्थ माझ्याघरात परत कितीतरी वर्षांनी मम्मम् साठी झाले.एक विशेष म्हणजे रूपसोनाही आपल्या लेकीला मी काय खाऊ घालते याची चौकशी करत नव्हती.'आप तो मेरी माँ जैसी है.महकीको अच्छा ही खिलाएगी.' हा तिचा विश्वास बघून मला भरून येतं. मात्र मेहेक अम्मीजवळ जायची लहर आली की रांगत जायची.रात्री झोपायला अम्मीच हवी. मी कुठेही गेले की मेहेकसाठी चिमुकले फ्राॕक आणते.तिला नटवण्यात रूपसोनाच्या बरोबरीने माझा सहभाग असतो. मध्यंतरी आम्ही तीन महिने लेकाकडे ग्वाल्हेरला गेलो होतो.लहान मुलांना विसरायला तेवढा काळ खूप झाला.म्हटलं ही विसरणार मला.मला हररोज तिची आठवण येत होती.व्हीडीओ काॕलवरून रूकसोना आमची भेट घडवी,पण तेवढी समज मेहेकला कुठली? म्हटलं विसरली.आता कसची येतेय पूर्वीसारखी ? पण आश्चर्य म्हणजे तीन महिन्यांनी आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा मला बघताच मेहेक झेप घेऊन मला बिलगली.खूप वेळ सोडीचना.मला भरून आलं. परत एकदा मेहेक आणि मी यांची गट्टी जमली. मेहेक आता पावणेदोन वर्षांची झालीय. पाय फुटलेत आता.दुडुदुडु इकडून तिकडे ये जा चाललेली असते.दिवसा आमचं दार बंद ठेवलेलं चालत नाही मॕमना.रडून गोंधळ घालतात. आता रागावलेलं कळतं.इगो दुखावतो चटकन्.मग ओठ मुडपले जातात.गाल अजून गोबरे होतात.डोळ्यांची तळी भरतात.एकूणच रूपडं रागावणा-याचा राग खल्लास करणारं होतं. तरी अम्मी लोकांना जास्त लाड करायची सवड नसते.मग मेहेकचा राग न काढताच ती पटपट पुढच्या कामाला लागते.मग मेहेकबाई न्याय करायला आजीकडे पळत येतात.हातवारे आणि अँ ऊं च्या भाषेत आम्मीची जोरदार तक्रार होते.या तक्रारीची दखल घेणं कंपल्सरी असतं.आजी जज्ज कणकेचे हात धुवून मेहेकला उच्यून अम्मीसमोर उभी राहते. " वाsss ती अम्मी ! कोण ओरडलं मेहेकला ? वा sss !" असं जज्ज डोळे मिचकावत अम्मीला ओललतात.अम्मीही शाॕली म्हणते.अशा रितीने खटल्याचा डायरेक्ट निकाल लागून आरोपी हशत हशत खेळायला जाते. मेहेकचा दिवस उजाडला की ब्रश करायला ती माझ्याकडे येते.तिचा बेबीब्रश कुठे ठेवलाय हे तिला पक्क माहीत आहे,तो ब्रश काढून त्यावर इवली पेस्ट घालायची , ब्रशला आधी बुडबुड शंभो घालायची इथपर्यंत सगळ्याचं मार्गदर्शन मेहेकमॕम मला हातवा-यांनी करतात.मग तो ब्रश खिडकीतल्या चिऊला, फ्रीजवरच्या छोटा भीमला दाखवून आss करायचा.पाण्याची चूळ म्हणजे पाणी गिळायचं आणि जोरदार थूः आवाज काढायचा.तीच गत पेस्टची.आता आता थू बरं जमायला लागलंय.मग दातावर बोट फिरवून दातातली चिऊ चिव चिव ओरडते ते ऐकायचं.हसायचं गदगदून.मग आरशात बघायचे दातुकले. मेहेक अशी बागडत असते ; जणू मोगरा दरवळत असतो गोंडस गोड.... काय म्हणू या ऋणानुबंधाला ? कन्येसाठी केवढी असोशी होती जीवाला ! मला दोन मुलगे. मुलांना वाढवण्यातला आनंद मनःपूत घेतला.तरी संसाराच्या धबडग्यात मुलांचं बाल्य शंभर टक्के नाही अनुभवता येत. ते अनुभवलं दोन्ही नातू लहान असताना.आजीपण सुखाला लागलं.पण तरी छुमछुम पावलांची आस मनात तशीच होती.भाची, पुतणी यांच्या जन्मानं खूप आनंद झाला.पण त्या खेळवायला मिळाल्या नाहीत.सुटीपुरत्या राहिल्या.त्यांना फ्राॕक शिवणं, माळा बांगड्यांनी नटवणं असं करून हौस भागवली.पण ते घोट घोट पाणी होतं.आता वयाच्या या टप्प्यावर मुलगी नसल्याची खंतही मागे पडली होती.मुलगा मुलगी दोघे समान असं ठामपणे मानणारी मी आतून कुठेतरी मुलीसाठी किती तहानेली होते हे मेहेक आल्यावर कळलं. मेहेकने माझी सगळी तहान शान्त केली आहे.तिचं माझ्या कुशीत विश्वासानं झोपणं, माझ्या हातून काऊ चिऊचे घास भरवून घेणं, माझ्याकडून अंघोळ घालून घेणं, तिटीमिटी करून घेणं आणि नंतर आरश्यात बघून मुरडमुरड मुरडून फ्राॕकच्या घेराची गिरकी घेणं.... सगळं कसं माझ्या आनंदाची धणी पुरवणारं... तिच्या अम्मीनेही आपलं काळीज मोठ्या भरवशाने माझ्याकडे ठेवायला दिलंय.ही मंडळी आज इथे तर उद्या तिथे... उद्या बाडबिस्तारा घेऊन पश्चिम बंगालमध्ये परत गेली तर परतच्या गाठीभेटींचा निर्वाळा कोणी द्यावा ? मेहेक मोठी होईल... किशोरी... कुमारी... तरूणी..होईल. तिला ही आजी आठवण्याच्या शक्यता धूसर आहेत...! तसंही असो. मला मात्र हा आनंदाचा फुलपुडा या वयात बहाल केला गेला आहे.माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत 'मेहेक' अशीच लाघवीपणाने माझ्यात दरवळत राहील हे केवढं भाग्य ! माझ्या आयुष्यातली एवढीसुद्धा जागा रिकामी राहू नये याची काळजी घेणा-या नियतीचे ऋण शिरावर वागवण्यातही काठोकाठ आनंद आहे! ©*वैशाली पंडित*अतिशयमर्मस्पशी कथा
  • author
    03 ফেব্রুয়ারি 2020
    निशब्द केवळ निशब्द केले या लिखाणाने याला stars देण्याची निश्चितच योग्यता नाही माझी 🙏 बुध्द जेव्हा दर्पणात स्वतःशीच संवाद साधत जातात त्यानंतर प्रत्येक शब्दागणिक सरसरून काटा उभा राहिला वाचतांना आपले आभार कसे मानावेत हेच कळत नाही मला इतका उत्कृष्ट वाचन करून वाचन प्रवास समृद्ध झाला आहे असं वाटलं 🙏🙏🙏🙏🙏
  • author
    SR
    30 জুন 2019
    खूप सुंदर पणे शब्द वर्णन केले आहे. डोळ्या समोर तसेच चित्र उभे राहिले.. भ. बुध्द आणि यशोधरेचे जे संवाद होते त्यामुळे डोळ्यात पाणी आले... अप्रतिम शब्द बांधणी केलीत.... हे सांगण्यासाठी शब्द अपुरे आहेत.... खूप सुंदर... खूपच सुंदर.. प्रतिलिपी वर खूप कथा वाचल्या.. पण आज पहिल्यांदाच डोळ्यात पाणी आलं..... कथा वाचून😢