ती दिसली अन् मनात बसली
ती होती भारी असली
की ह्रुदयात कायम ठसली
तिच्या नजरेत तीर
करतात वार
करती घायाळ
पुरती झाली हार
अशी ती नार
स्वर्गातली अप्सरा जसली
ओठ लालेलाल
गोड गुलाबी गाल
मृगासारखी मदमस्त
तिची चाल
बघणा-याचे झाले हाल
जेव्हा ती गालात हसली
नाजुक सुंदर कटी
कंकनाचा चुडा हाती
सोनेरी टीकली
कपाला वरती
औरच दिसे नार ती
अन्य नसे कोणी असली
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा