शी यार आज रविवार, निषाद खूप वैतागला होता, त्याला रविवार बिलकुल आवडत नसे, साधारणतः सुट्टी म्हटली की सर्वांचा आवडता दिवस पण निषाद ह्याला अपवाद होता, कारण त्याला दिसणारी ती रोज आज दिसणार नव्हती, त्याच तिच्यावर खूप प्रेम होतं पण लाजरा बुजरा निषाद ते व्यक्त करता येत नव्हते. निषाद हा बँक मध्ये जॉब करत होता, अगदी साधा सरळ कोणाचेही मन न दुखावणारा सर्वाना आपलंसं करणारा. त्याला सकाळी १० ते ६ हा वेळ खूप आवडायचा त्याला कारणही तसेच होते कारण ती त्याला त्या टाईम मध्ये दिसायची. निषाद ने ऑफिसला जायला मेट्रो ...

