मी रूही सदानंद कापगते....स्पृहा... माझ्यातील मला शोधन्याचा अर्थपूर्ण प्रवास.... काव्य लेखनाची आवड मला वयाच्या ११ व्या वर्षांपासून जडली...आणि त्यातुनच साध्य झाला वयाच्या १८ व्या वर्षी.. पहीला कविता संग्रह 'स्पृहा'.......
सारांश

छान.
"झाडूला हात नको लावू राणी, झाडू छी छी असतो, छी छी..."
"बाबा, झाडू जर छी छी असतो; तर तो आपलं घर कसं साफ करतो?"
...असे असंख्य निरागस प्रश्न विचारुन मला अनुत्तरित करणारी, मी ऑफिसमधून घरी आल्यावर आनंदाने जोरजोरात उड्या मारत घर डोक्यावर घेणारी, क्षणभरही माझ्याशिवाय न करमणारी, सकाळी उठल्या उठल्या मला गोड गोड पापा देणारी माझी तीन वर्षाची चिमुरडी आज माझ्यावर रुसली होती. कारण, आज पहिल्यांदा तिचा बाबा तिच्यावर रागावला होता. गाल फुगवून, माझ्याशी कट्टी करून, रड रड रडून, शेवटी माझ्याच कुशीत येवून ती झोपली होती. तिच्या इवल्यांशा गालांवर आलेले अश्रुंचे ओघळ पाहुन मला गहिवरुन आलं आणि माझ्याही डोळ्यात अश्रु तरळले.
त्या दिवशी, रात्री उशिरापर्यंत मला झोपच लागली नाही. आपलं कुठं चुकतं याचा खूप वेळ विचार केला आणि मनोमन तिची माफी मागितली. तिच्या खूप साऱ्या पाप्या घेत, तिला म्हणालो, "तुझा बाबा आजवर खूप चुकला. दुसऱ्यांच्या चुका काढण्यात पटाईत असणारा तुझा बाबा, आजवर साफ चुकला. ऑफिसच्या कामाचा राग, आज पिल्लू, मी तुझ्यावर काढला."
"तुझा वेडा बाबा आजपर्यंत तुला त्याच्या पस्तीस वर्षाच्या अनुभवाच्या मापदंडातुन कायम पहात आला. तीन वर्षाच्या छकुलीला त्यानं तिच्याएवढं होउन, तिच्या द्रुष्टीकोनातून कधी पाहीलच नाही. तुला शाबासकी कमी, आणि छोट्या छोट्या गोष्टीत कदाचित टोकलंच जास्त. कामात गुंतलेल्या तुझ्या या बाबाला तु आज फक्त एकदाच माफ कर."
"उद्यापासून तुझा हा बाबा तुझ्यावर कधी कधी रागवणार नाही. वैतागलेल्या, चिडलेल्या सुरात तुझ्याशी कधीही बोलणार नाही. प्रत्येक गोष्ट माझ्या राणीला खूप प्रेमाने समजावेन. पहाटेच उठून, लवकर आवरून, ऑफिसला जायच्या आधीही तो तुझ्याशी वेळ काढून खेळेल. सुट्टीच्या दिवशी, तुला गाडीवर बसवून मोठ्ठी चक्कर मारून आणेल. ऑफिसहून आल्यावर तुझ्याशी खूप खूप गप्पा मारेल. रात्रीचं मम्मम, न चुकता, तुला तुझा बाबा हाताने भरवेन आणि झोपताना तुला चिऊ-काऊची गोष्टही सांगेन. तुझा बाबा यापुढे तुला कधी कधी रडवणार नाही."
"तुझ्या बाबाचं तुझ्यावर खूप जिवापाड प्रेम आहे. अगदी तूझं जसं आहे ना तुझ्या बाहुलीवर, अगदी तसं. पण तुझ्या वेड्या बाबाला ते तुला कधी सांगताच येत नाही." असं म्हणताच, झोपेतच, गालातल्या गालात ती गोड हसली. बहुतेक तिच्या बाबाला तिनं माफ केल होतं.
- गौरव बापट
[email protected]
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
बापाचं रडण मुली बघू शकत नाही
तायचे दु:ख पोरीला च माहित
पण ती बोलु शकत नाही
कारण विना कारण सगळे
तिला ज्ञात असते.
पण ती बोलू शकत नाही
शेवटी....फक्त बाप आसतो.

वडील मुलीचे weak point असतात. मला माझ्या वडिलांचा खूप लळा होता. मी काॅलेज ग्रंथालयात काम करायची. वयाच्या
७५ व्या वर्षी पण माझे वडील हिरो होंडा चालवायचे. मला अधून मधून काॅलेजला सोडायला यायचे. त्यांच्या मागे गाडीवर बसून मोठ्या दिमाखात यायची . वर्हांड्यात उभे असलेले विद्यार्थी
एकमेकांना सांगायचे, अरे ते मॅडमचे वडील आहेत म्हणून, तेंव्हा
मला माझे वडील मला Heroच वाटायचे !!!!