. . सकाळच्या कोवळ्या उन्हात , अंगणातल्या झोपाळ्यावर मी पेपर वाचत बसले होते . खूप दिवसांनी अचानक आलेल्या ह्या गारव्यात उबदार उन्ह सुखद वाटत होतं पेपरवर कुणाचीतरी सावली पडली म्हणून दचकून वरती पाहिलं. रोज सकाळी फिरायला जाताना हमखास भेटणाऱ्या बाई आणि त्यांची मुलगी उभ्या होत्या . मी थक्कच झाले . नेहमी भेट होत असल्यानं एकमेकींकडे बघून हसणं - कधी दूरवर असलोतर हात करणं , एखाद्यावेळी भेट नाही झाली तर , " दिसला नाहीत बऱ्याच दिवसांत ! " असं एखादं वाक्य टाकणं , एवढीच ओळख होती आमची . पण तेवढ्या ओळखीवर त्या ...