सर्व प्रथम आपण दिलेल्या प्रोत्साहना करिता धन्यवाद....मी सामाजिक कार्य करते. नगरसेवक म्हणून काम करताना तसेच वैदिक ज्योतिष आचार्य व लेक्चरर् म्हणून काम करताना फार वेळ मिळत नाही पण वेळ मिळाला की स्केचेस काढते आणि वेगवेगळे लेख लिहिते.मुळात मी वाचक आणि लेखक आहे. बऱ्याच विचारवंतांची आणि वेगवेगळ्या विषयांवर बरीच पुस्तके वाचली आहेत. मी माझ्या दोनशेहून जास्त असलेल्या पेंटिंग करिता आणि बारा ..तेरा पुस्तकां पेक्षा अधिक असणाऱ्या पुस्तकां करिता, माझ्या प्रेरणास्थान व माझ्या गुरु परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांना विशेष धन्यवाद देते व कोटिकोटी प्रणाम करते. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी समाजकारण-राजकारण, आचार्य, लेक्चरर, पेंटिंग, लेखन, पुस्तके व सामाजिक संपर्क या सर्व काही गोष्टी विनासायास करत आहे. या ठिकाणी लिहिलेल्या तथा प्रकाशित केलेल्या सर्व कथा या काल्पनिक असून या माध्यमातून निव्वळ वाचकांचे मनोरंजन व्हावे तसेच वाचकांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी म्हणून केलेला हा लिखाण प्रपंच आहे. अमेझॉन वर काही पुस्तके पब्लिश झालेली असून आगामी काळात दोन पुस्तके पेपर बॅग स्वरूपामध्ये लोकांना वाचनास मिळतील विशेष म्हणजे ॲमेझॉन वरती नव्याने पब्लिश होणारे पुस्तके ही इथे केलेल्या लिखाणापेक्षा वेगळी असतील.मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आमच्या गुरु परमपूज्य श्री माताजी यांना माझी सर्व पुस्तके समर्पित आहेत.
महुआ: दारू से दवा तक आदिवासीओंकी जान (Marathi Edition) https://www.amazon.in/dp/B0B1KX7BTW?ref_=cm_sw_r_apann_dp_W053W42AQETPF827R9QP
आत्मसाक्षात्कार : परमोच्च आनंदाची अवस्था (Marathi Edition) https://www.amazon.in/dp/B0BTC69TF7?ref_=cm_sw_r_apann_dp_93ZB17DPJAZGYJ5T0PAK
Only seven steps: Towards being human https://www.amazon.in/dp/B0BTCLF5SV?ref_=cm_sw_r_apann_dp_0WV78KHYXYEHM8N77TP8
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा