pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चाळीशी नंतरच प्रेम .......

4.5
76909

ब्रेस्ट कँसर ऐकलं जरी तरी अंगावर काटा उभा राहतो ......देवयानी आजारामुळे मानसिकरीत्या खूप हळवी होते तिच्या सौंदर्याचा भाग असणारा अवयव काढून टाकणार हे कळल्यावर .....ती विचार करते ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
( प्रणाली देशमुख )

प्रिय वाचक मी प्रणाली देशमुख .... थोडा परिचय ... 1लोकमत मैत्र पुरवणी , ऑक्सिजन पुरवणी मध्ये , सकाळ युवा , सकाळ सकाळ टुडे ,मनमोराचा पिसारा पुरवणीत लेख , देशोन्न विरंगुळा पुरवणी , अशा अनेक वृत्तपत्रासाठी सामाजिक , कौटुंबिक 2001 पासून 2021 पर्यंत लेख कविता लिखाण प्रकाशित झालय . 2) विविध दिवाळी अंकात कथा प्रकाशित .हृदय स्पंदन , शब्दकार , नाती , अशा अनेक मासिकात कथा लेख प्रकाशित 3) मराठी सिनेमा कलाकार सुबोध भावे यांनी " पृथ्वीराज संयोगिता " कथेचं अभिवाचन केलंय . 4)इंडियन भारत लिखाण स्पर्धेत जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे , अरविंद जगताप , यांनी महाराष्ट्रातून 25 विजेते निवडले ,त्यामध्ये प्रणाली देशमुख यांचा " माझ्या गावातील कलंदर व्यक्तिमत्व ह्या लेखाची निवड झाली . पुण्याच्या पत्रकार भवनात सन्मान करण्यात आला . 5) अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक ( कुसुमाग्रज नगरी )2021 ला निमंत्रितांच्या कवी कट्ट्यासाठी आमंत्रित करण्यात आलं . 6) स्थानिक कविसंमेलनात सक्रिय सहभाग . 7) कलाजागर संस्थेतर्फे 2021 चा कविरत्न पुरस्कार जाहीर . 8) मानवसेवा संघातर्फे सावित्रीबाई स्त्रीभूषण पुरस्कार प्राप्त 9) प्रतिलिपी मराठी महाकथा स्पर्धेत चाळिशीनंतरच प्रेम कथेचा पहिला क्रमांक आला 30000 हजार रोख बक्षीस मिळालं . 10) प्रतिलिपी मराठी प्रेम कथा स्पर्धेत " तू अशी जवळी राहा " कथेचा पहिला क्रमांक 10000 रु धनराशी . 11) प्रतिलिपी मराठी भयकथा स्पर्धेत ' भुताटकी 'कथेला चौथा क्रमांक मिळाला रोख 50000 धनराशी मिळाली . 12) प्रतिलिपी मराठी सिनेरंग कथास्पर्धेत विवाह कथेचा पहिलं पारितोषिक मिळालं 13) प्रतिलिपी मराठी कथा स्पर्धा मध्ये विश्वास ह्या कथेला दुसरं पारितोषिक मिळालं . 14) 2020 प्रतिलिपी साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित . आईला लिखाण खूप आवडायचं ....तिची कामं आटोपली कि .... ती अगदी सहज बंगळीत बसून तिथल्या तिथे कविता रचायची आणि आम्ही भावंडं तिच्या पाठोपाठ म्हणायचो .... कदाचित तिच्यामुळे मी पण लिहायला लागले ....हा वारसा तिच्याकडूनच आलाय ....इयत्ता चौथीत असतांना पहिली कविता लिहली ....मग माझी आवड आपोआप वृद्धिंगत झाली ....शाळेत निबंध स्पर्धेत माझं बक्षीस अगदी हक्काचं असायचं .लोकमत मधील मैत्र या पुरवणीत बरेच लेख प्रसिद्ध झालेत ....युवा सकाळ ,विरंगुळा या सकाळ आणि देशोन्नती मधील पुरवण्यातही लिखाण प्रकाशित झाले आहे .माझं शिक्षण एम .ए .बी .एड .वाचनाची आणि गाण्याची आवड ...आवड म्हणता येणार नाही .इट्स माय पॅशन .....कॉलेजमध्ये असताना अभिनयही करून बघितला .....एक दोन एकांकिकाही लिहल्या .... जीवनातील अनुभवातून ....सहज सुचलेल्या मनाला भिडणाऱ्या कथा किंवा कविता .....आपल्याच जीवनाचा भाग असतात .जीवन हे कडू गोड अनुभवातून .....रुचकर बनतं .....येणाऱ्या परिस्थितीचा कसा सामना करायचा हे नकळत समजावून जातं ......येणारं सुखदुःख अलगद वेचायचं असतं " लाईफ हे असच असतं " [email protected] प्रणाली ~

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vaibhav Kanase "हॅरीस"
    07 अप्रैल 2019
    जोडीदाराची आवश्यकता तरुणपणात नव्हे तर उतारवयात जास्त गरजेची असते.देवयानी व इंद्रनील यांची कथा वाचताना हे वारंवार जाणवते.सौदर्याचा एक महत्वाचा अवयव कमी होणार ही कल्पना देवयानी सहन करु शकत नाही.नवरा आपल्याला स्विकारेल का? हा महत्वपूर्ण प्रश्न देवयानी समोर उभा राहतो.साधारणपणे चाळीशीनंतर स्त्री ही रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभी असते तसेच तिच्या शारीरीक सौदर्याला अोहोटी लागण्यास सुरुवात झालेली असते.पती,मुले त्यांच्या विश्वात मग्न असतात व अशा स्त्रीला मानसिक एकटेपण खायला उठते.निसर्गनियमाने अस्ताला निघालेले तारुण्य याची पुसटशी जाणीव झाल्याने देवयानीची चिडचिड वाढते.वक्षकर्करोगासारखा जीवावर बेतणारा आजार झाला तरी सौदर्याचा शारिरीक अलंकार कायमस्वरुपी निखळणार या कल्पनेने तिचा उपचारास नकार असतो.इंद्रनिलविषयी मनातील दुषित भावनेमुळे देवयानीची चिडचिड व रागीटपणा वाढतो.पण कथेचा नायक व देवयानीचा पती इंद्रनिल ज्या पध्दतीने तिचे दवाखान्यातून सोडल्यावर स्वागत करतो त्यावरुन इंद्रनील हा सहचारिणीवर सौदर्य बघून नव्हे तर त्यापलिकडे जाऊन प्रेम करीत होता हे लेखिकेने मांडले आहे,नेमकी हीच बाब वाचकांच्या मनात बसते.उतारते वय म्हणजे 45 शी नंतरचे वय हे आजारपण,एकटेपण,परावलंबत्व,मानसिक दुबळेपण,(बरेचवेळेस) अर्थिक लाचारी घेऊन येते.तरुणपणी जोडीदाराची साथ कमी असली तरी चालते पण उतारत्या वयात जोडीदार जवळच पाहिजे.एकमेकांची साथ ही कोणत्याही अौषधापेक्षा सर्वश्रेष्ठ असते.लेखिकेने कथा रेखाटना व्याकरणाची कोणतीच चूक केली नाही यातून तिच्या लेखन-कौशल्याच्या अनुभवविश्वातील परिपूर्णतेची कल्पना येते.लेखिकेने मांडलेल्या प्रत्येक प्रसंगातून कथा मनाला भिडत जाते यातच लेखिकेचे यश सामावले आहे.वेगवान कथा लिहताना ती कुठेही रटाळ व कंटाळवाणी वाटणार नाही हे कसब लेखिकेच्या कौशल्याचे आहे.वक्ष कर्करोगावरील उपचारानंतर मनात होणारी घालमेल व पतीच्या मानसिक दुरतेविषयी वाटणारी देवयानीची काल्पनिक भिती ही कथेच्या उत्तरार्धात काल्पनिकच ठरते.तर देवयानीवर वयाच्या 40 शीनंतरही 25 शीतील प्रेम देणारा इंद्रनिल हा परीपूर्ण पती वाटतो.लेखिकेने मांडलेली कथा सुंदर असून कथेचा आशय हा साधा पण जीवनातील एका टप्याचे सत्य अधोरेखित करणारा आहे.
  • author
    Avinash Nimbalkar
    22 मार्च 2019
    खूपच सुंदर लेखन आहे.. अशा प्रकारे कोणत्याही रुग्णाला आधार दिला तर त्याचा आजार विसरून तो लवकरात लवकर बरा होतोच...प्रेम असावे तर असे .. हॅट्स ऑफ . प्रणाली.. पुढील लिखणाकरिता शुभेच्छा...अशाच सुंदर कथा आपल्या लेखणीतून येत राहोत...त्यामुळे आम्हा वाचकांना..त्या वाचता येतात ..
  • author
    प्रेम ला वय नसते ते अगदी खरे आहे.