pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

आठवण

4.2
4681

एक जुनी आठवण कालच्या दिवसासाठी सहजच सुचलेला एक प्रसंग सगळ्यांशी शेअर करत आहे. मी आणि माझी पत्नी १९९९ च्या विंटर मधे आमेरिकेत बोस्टन या शहरात वस्तव्यास होतो. तेथे माझा मुलगा एका इन्व्हेस्टमेंट बँकेत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
निशिकांत देशपांडे

नाव--- निशिकांत देशपांडे. मूळचा अंबाजोगाईचा पण बरीच वर्षे औरंगाबादला व्यतित केली. गेल्या सहा वर्षापापासून पुण्यात कायम स्वरूपी स्थायीक. नोकरीसाठी स्टेट बँक ऑफ हैद्रबाद मधे पदार्पण. कारकून म्हणून भरती आणि अनेक शिड्या चढत चढत शेवटी उप-महा प्रबंधक (डेप्युटी-जनरल मॅनेजर) या पदावरून २००४ साली निवृत्त. वयाच्या ५७ व्या वर्षी काव्य लेखनास सुरुवात. वयाच्या ६२व्या वर्षी मराठी गझल लिखाणास प्रारंभ. "कल्पतरू" मराठी काव्य संग्रह , "आहट" हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित. दोन मराठी गझल संग्रह "रुतबा तुझ्या रुपाला" आणि "रंग मावळतीचे" प्रकाशनाच्या मार्गावर. ऑल इंडीया रेडिओ औरंगाबाद आणि पटियाला वरून काव्य वाचनाचे कार्यक्रम केलेले आहेत. दोन वेळेस पटियाला रेडियो केंद्रावरून केंद्रीय बजट प्रस्तावावरील चर्चेत सहभाग. अनेक गझल मुशायऱ्यात, काव्य संमेलनात आणि साहित्य संमेलनात निमंत्रित कवि/शायर या नात्याने सहभाग. त्या पैकी कांही सहभाग घेतलेल्या कर्यक्रमाचा तपशील असा :-- १) सद् भावना विचारमंच व जनमानस प्रतिष्ठान तर्फे आयोजित काव्य साहित्य संमेलन-२०१० मधे निमंत्रित कवी म्हणून सहभाग. २) मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित शायर म्हणून सांगली येथे सहभाग. ३) रंगत-संगत प्रतिष्ठान आणि फडणीस फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव-२०१२ मधे निमंत्रित कवी म्हणून सहभाग. ४) शब्द साहित्य संमेलन २०१२ आलीबाग येथे निमंत्रित शायर म्हणून सहभाग ५) आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सातारा आयोजित "ये रे घना" मराठी काव्य मैफिलीत आमंत्रित कवी म्हणून सहभाग ६) मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०१३, जळगाव यात निमंत्रित शायर म्हणून जळगाव येथे सहभाग. ७) गारवा साहित्य संमेलन-२०१३, निमंत्रित शायर म्हणून सहभाग. ८) पहिले शब्द मराठी विश्व साहित्य संमेलन २०१४ बँकॉक, थायलंड येथे निमंत्रित शायर म्हणून सहभाग ९)"रंगवार्षा"-रंगारंग कवितेची मैफिल या सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात निमंत्रित शायर म्हणून सहभाग १०) जनमानस ग्रुप अंकूर साहित्य संघ , जळगाव आयोजित काव्य संमेलनात सहभाग. ११) "गझल :सुरेश भटांनंतर" या डॉ. राम पंडित संपादित पुस्तकात माझ्या दोन गझलांचा समावेश. १२) मराठी ग़ज़ल-सुरेश भटानंतर या गझल नवाज भीमराव पांचाळे संपादित पुस्तकात माझ्या दोन गझलांचा समावेश या व्यतिरिक्त बर्‍याच कार्यक्रमात सहभाग. बर्‍याच गझला, कविता विविध वर्तमानपत्रातून आणि मासिकातून प्रसिध्द. औरंगाबादचे प्रसिध्द गायक डॉ. पराग चौधरी "रुतबा तुझ्या रुपाला" नावाने माझ्या गझलांच्या गायनाचा सुश्राव्य स्वतंत्र बहारदार कार्यक्रम करतात.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Priti Mokal
    14 जानेवारी 2021
    नेहमी असेच खुष राहा
  • author
    Pravin Bajaj
    05 नोव्हेंबर 2019
    झकास 👍👍
  • author
    Tejashree K
    28 ऑगस्ट 2017
    Chan....
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Priti Mokal
    14 जानेवारी 2021
    नेहमी असेच खुष राहा
  • author
    Pravin Bajaj
    05 नोव्हेंबर 2019
    झकास 👍👍
  • author
    Tejashree K
    28 ऑगस्ट 2017
    Chan....