एक भावना संवेदनेची....
आत्मकथा या लेखनीची....
लेखक किंवा कवी तो नाही....
जो स्वतःच्या मनात असतो....
खरा कवी तर तो असतो....
जो दुसर्याच्या मनाची कदर करतो....
अनुभव कटु असेल तोच
अधिपती इथे ठरतो....
खोलवर रुतलेल्या काट्याला....
भावनेसोबत जळत ठेवतो....
असेल ही गोड गोष्टी त्याकडे ही....
पण खरी मजा तर त्याला विरहातच येते....
शब्दाचे भंडार असेल लाखमोलाचे....
तरी पण त्याला भुक इतकी तर कमीच पडते....
हेतू एकदम साधा असतो....
मनाची पोकळी शब्दात ऊघडी करुन ठेवतो.....
शेवट कसा करणार... सुरुवात केली आहे....
यातच एक महाकाव्य लिहुन ठेवतो....
तोच असतो एक लेखक असो वा कवी...
इतिहासात अजरामर होऊन जातो....
-"शब्दरंगी" सागर.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा