प्रकाश हरिश्चंद्र पाटील
प्रकाश पाटील हे कवी/लेखक असून सन २०१५ ते २०१८ या कालावधी करिता कोकण मराठी साहित्य परिषदेचे वसई शाखेचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम सांभाळले आहे. लेखन क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अंत्यंत दर्जेदार कविता लिहिल्या आहेत. त्यांचा "नकळत" हा कविता संग्रह २०१४ मध्ये प्रकाशित झाला असून या पुस्तकास २०१४ सालचा सहयोग साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. समाजातील व्यंगावर भाष्य कराणारी त्यांची "माझा दादा बिल्डर झाला " ही मराठी आगरी-कोळी लोकगीतांची विडीओ सीडी २०१२ मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१२ मध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेच्या मैरेथोनसाठी त्यांनी थीम सॉंग बनविले होते.
सामाजिक क्षेत्रात देखील ते कार्यरत असून दहा वर्षे ते वसई पूर्वेतील गोखिवरे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. ते गोखिवरे विकास मंडळाचे, तसेच भूमिपुत्र श्रमिक कामगार संघटनेचे खजिनदार होते . या मंडळा मार्फत विविध आरोग्य, सांस्कृतिक , सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. विविध आरोग्य विषयक शिबिरे आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आकांक्षा नागरी सहकारी पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. कनकाई मातामंदिर समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. अशाप्रकारे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीत गेल्या दशकाहून अधिक काळ फार मोठे कार्य असणाऱ्या "एकता कल्चरल अकादमीचे ते सचिव आहेत.
त्यांनी लिहिलेल्या कथा अत्यंत उत्कंठावर्धक असून प्रतिलिपीवर त्यांच्या अनके रहस्य कथा आपणांस वाचावयास मिळतील.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा