नमस्कार,
मी आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधे पटकथा लेखिका म्हणून काम करते. माझा एक सिनेमा "ऑनलाईन गुरू" प्रदर्शनसज्ज आहे. फार पूर्वीपासून वाचनात रस होता. त्यातूनच पुढे लेखनाची आवड व त्या आवडीतून आज व्यावसायिक लेखन करतेय. आजही किमान दोन पाने वाचल्याशिवाय दिवस संपत नाही!
सुरूवातीला प्रत्येक पुस्तक वाचून झाले की, त्या पुस्तकाबद्दल काय वाटलं, मनावर कुठला नवा संस्कार झाला ह्याचं टिपण काढून ठेवण्याची सवय होती, त्या सवयीचंच पुढे नियमित लिखाणात रुपांतर झालं!
मग आपल्या काही कल्पना साकारात जाऊन कथांचं, दीर्घकथांचं लिखाण होत गेलं.
एखादं पुस्तक मग त्या कथा असो वा कादंबरी अथवा कविता, वाचून झाल्यानंतर त्या कलाकृतीतून जो काही निखळ आनंद मिळतो, त्या लेखकाशी मनोमन जे एक नातं जुळतं, तशा प्रकारचं नातं आपल्या लेखणीतून जोडल्या जावं, वाचकांशी लेखणीतून संवाद व्हावा, आपल्या कलाकृतींतून आपणही असा आनंद द्यावा ह्या उद्देशाने लेखनप्रवास सुरु आहे! ह्या आनंदाची देवाण-घेवाण हा प्रमुख उद्देश!
-बागेश्री
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा