@# सुनिता युवराज चव्हाण
मुलांमध्ये हरवणारी,
मी एक शिक्षिका,
अंतर्मनात डोकावणारी,
मी एक लेखिका,
मनीचे भाव शब्दात मांडणारी,
करते मी कविता,
काव्यात गुंफते मी,
शब्दांची सरिता,
मुलांमध्ये मूल होऊन,
शिकते शिकवता शिकवता,
कामामध्ये तल्लीन होऊन,
येतो आनंद लुटता,
रोजच नवा उपक्रम,
आनंददायी शिकता,
भेटतो मला आनंद,
कुटुंबाचे भरण-पोषण करता,
अवतीभवती दोन प-र्या,
अन् मी त्यांची माता,
सगळे काही मिळाले,
जीवन जगता जगता,
मी कोण हा प्रश्न??,
स्वतःला पुसता पुसता,
मिळाले बघा उत्तर,
अंतर्मनात डोकावता
©® सौ. सुनिता युवराज चव्हाण
समस्या नोंदवा