अंगाचा सगळा पसारा आवरत अमावस्येच्या रंगाची चन्नम्मा धडपडल्यासारखी अंथरुणातून उठली. तिच्या उठ्ण्यातल्या लगबगीचं तिलाच हसू आलं. अजून दहा मिनिट काय किंवा तास काय, काय मोठा फरक पडणार आहे. अंगभर कसकस भरून आल्यासारखं वाटलं तिला. अजून किती दिवस जगणार आपण? संध्याकाळ झाली की आणि सकाळी उठली की हा प्रश्नं तिला रोजचा पडायचा. तिच्या खोपटात कुणी यायचं नाही, ती कुठे जायची नाही कारण तिला कुणीच बोलवायचं नाही. वीस वर्षामागे तिचा भाऊ गेला तेंव्हापासून ती एकटीच होती. अंदाजे पन्नास वर्ष झाली आपल्याला, अजून किती ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा