माझा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या पोई या छोट्याशा निसर्ग संपन्न गावी झाला. लेखनाची सुरुवात झाली ती 1993 पासून. स्वतःच्या साठी लिहिलता लिहीता कधी दुसय्रासाठी लिहायला लागलो ते कळलंच नाही. वर्तमानपत्रात, मग दिवाळी अंकात मग मासिकात करता करता स्वत चा " पळसबहर "हा कविता संग्रह प्रकाशित झाला ते ही कळलं नाही. मग आकाशवाणी मुंबई केंद्राकडे कविता वाचनाचे कार्यक्रम केले. कथा लेखन ही करायला लागलो. हळूहळू साहित्यातील सर्वच विषय हाताळले. सामाजिक कविता हा माझा आवडिचा विषय. मी जितका या विषयावर लिहतो.त्यासारखेच प्रेम कविता हा पण जिव्हाळ्याचा विषय आत्ता पर्यंत बरीच मुसाफिरी केली.अजुनही काही पुस्तके प्रकाशित व्हायची आहेत तसा माझा मूळ पिंड शिक्षकांचा रान फुलांना शिकवता शिकवता. लिहतो.नव्हे माझ्या आजूबाजूला जे घडते ते मला लेखनाची प्रेरणा देते.आणि मी झपाटून लिहतो. : " शब्द माझे धन ; शब्द माझे ऋण. शब्द माझे गुण ; ऐकऊ लोका शब्द माझ्या ओठी ; शब्द माझी मिठी शब्द गारगोटी : चेतवू लोका शब्द माझे आहेर ; शब्द आतबाहेर . शब्दांचे काहूर ; माजवू लोकांची धनाजी वाटितो ;शब्दात गोडवा माणूस जोडला; शब्द मध्ये. श्री. धनाजी जनार्दन बुटेरे पोई कल्याण ठाणे [email protected]
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा