हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.
समस्या नोंदवा