मुसळधार पावसातल्या एका थेंबाने स्वतःविषयी काय सांगावे
अथवा गवतफुलाने स्वतःच्या अस्तित्वाची उंची कशी आणि ती काय वर्णावी
इतर अगणित दिव्यांच्या झगमगाटात मायमराठीच्या प्रकाशाने उज्वल तेजोमय झालेल्या एका छोट्याश्या दीपकाने स्वतः वेगळेपण ते काय दाखवावे किंवा साहित्यजगतातील हिरव्यागार बागेश्रीने नटलेल्या फळाफुलांनी बहरलेल्या ह्या वाड़मयीन प्रवासात एका छोट्या क्षणभंगूर झुळूकेने आपली ओळख ती कशी द्यावी
मी, डॉ सचिन मंत्री, आपल्यासारखाच सर्वसामान्य मराठीचा रसिक भक्त आहे. आणि आपल्यासारखाच स्वतःच्या आगळ्या रंगात रंगलेला, झुळकेसरशी डौलणारा, स्नेहाची, आपुलकीची ओल जपत भाषामाधूरी चाखत मनमुराद रेंगाळणारा चारचौघां इतुका दर्दी आहे.
शास्त्रीय व्याकरण वा भाषेची कोणतीही पदवी आभ्यास नसतांना एक छंद जोपासणारा प्रतिलिपीचा वाचक सदस्य आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा