मी साईनाथ सुरेश टांककर. लेखन करण्याची आवड. माझे स्पर्श, मना-तले काही, मी पुन्हा येईन हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच 'प्रेमाच्या एका वळणावर' आणि 'नात्यांचा रिचार्ज' हे लघु कथा संग्रह आणि स.न.वि.वि. हा पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच चेकमेट, हे खेळ माणसांचे, देवाघरचा पाहुणा, मुखवटे, रिलेशन आणि कुणी तरी येणार येणार गं या नाटकांचे लेखन, मामाच्या गावाला जाऊया या बाल नाट्याचे लेखन तसेच अंत-आरंभ, केमिकल लोचा, बॅचलर पार्टी, देवाघरचा पाहुणा या एकांकिकेचे लेखन केले आहे. हे खेळ माणसांचे या नाटकाला श्रीरंग चा नाट्य लेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, मुखवटे या नाटकाला मराठी नाट्य परिषदेचा नाट्यलेखनाचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि मामाच्या गावाला जाऊया या बालनाट्याला मराठी नाट्य परिषदेचा नाट्य लेखनाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा