श्री. गणेशाय नम: (अभंग)
दर्शन घेऊन ॥ श्रीगणेशा करा॥
दोन हात धरा॥ त्याच्यापुढे ॥१॥
वंदन करावे॥ श्रीस्तवन गावे॥
आनंदी रहावे॥ नित्यदिनी॥२॥
सकळांचा राजा॥ तोच विघ्न हर्ता ॥
तोच सुखकर्ता ॥ श्रीगणेश ॥३॥
पुजन करुया॥ वंदन करुनी॥
शेंदूर धरुनी॥ दुर्वा वाहु॥४॥
मोहन सोमलकर नागपुर
.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा