कुठून आरंभ करू?? माझे नाव??? हृदयाच्या तळाशी साठवून ठेवलेल्या पक्ष्याच्या पिलांना तरी कुठे नाव असतं... तरीही त्यांचं अस्तित्व त्यांच्या जगात असतचं ना!! आणि मग ती अवकाशा मध्ये मनसोक्त भरारी घेतांना नकळत त्यांना जो आनंद गवसत असेल... तो शब्दात व्यक्त करणे कठिणच !!!
खर म्हणजे माझी ओळख करून द्यायला कुठल्याही ओळखीची किंवा नावाची गरजच नाही.... प्रत्येक निसर्गनिर्मित गोष्ट निनावीच असते ना!! मुख्य म्हणजे माझ्या भावनांच अस्तित्व इतकं सर्वसमावेशक आहे की ते कुठल्याही ओळखीच्या कक्षेत सामावत नाही... त्याच भावना तुम्हा सर्व वाचकापर्यन्त पोचविण्याचा एक क्षुद्र प्रयास!!
आवडलं तर वाचा... नाही वाचले तरीही राग नाही.... प्रत्येकाची स्वतःची आवड असतेच की शेवटी!
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा