तुझ्या उभारी श्वासात,
आज एकरूप व्हायचय,
फक्त क्षण भर का होई ना,
तुझ्या मिठीत आज रहायचय,
मस्तकावर ओठांचा स्पर्श करून,
बेधुंद तुला करायचय,
तू अशी जवळ असताना,
साऱ्या जगाला विसरायचय,
तुझ्या केसांना स्पर्श करून,
तुझ्या बटे शी खेळायचंय,
हक्काने अस तुझ्या मांडीवर,
मला शांत धुंद लोळायचंय,
आज तुझ्याच बाहुपाशात,
मला हरवून जायचय,
तुझा आनंद द्विगुणित करायला,
सखे तुझ्या स्वप्नात यायचय.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा