हिला आजचं यायचं होतं. या लग्नाच्या वर्दळीत आधीच सगळं अंग दुखतंय, आता हा त्रास. परवा पूजा आहे. कसं सांगू. राणू ताई अग मला पाळी आलीये. कसं सांगायचं आता नवर्याकडच्यांना ? किती लोकं जमलेत. माझ्यामुळे सार्यांचा खोळंबा. नेमकं माझ्याकडे प्याड नाहीयेत. नसती कटकट झाली. ती स्नेहल आहे न तिला सांगते. ती गुपचूप आणून देईल. मी पण किती बावळटय. आईने सांगितलेलं, जायच्या ब्यागेत ठेव म्हणून. झालं आता, व्हायचं तेच झालं. “दाजी, पूजा आणि देव देव पुढं ढकलायला लागल बघा, नवरीला प्रोब्लेम आलाय. लोकं जमलेत बरोबर हाय तुमचं ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा