माझ्या लेखनाचा प्रवास साधा सरळ आहे. लिहलेली कविता तिला दाखवली,तिने सांगितलं म्हणून "प्रतिलिपी" वर पोस्ट केली. मग कविता अवतरली "प्रतिलिपीवर" अन उतरली तुमच्या मनात! असाच काय तो प्रवास!
लिहण्याची आवड मुळीच नाही, पण मनात गोष्टी रंगवण्याची आवड नक्कीच आहे. त्यातली एखादी गोष्ट कागदावर खरडली तर ती तुमच्यापर्यंत पोहचते.
तुमच्यासारखा मी सुद्धा "so called busy" माणूस आहे. मी स्वतःबद्दल प्रतिलिपीवर लिहण्याचा आज तिने हट्टच धरला. खरं तर मी स्वतःचा फोटो टाकावं आणि स्वतःबद्दल लिहावं असं तीच मत होतं. पण काही गोष्टींबद्दल चेहरा, वय, काळ, वेळ माहीत नसले की ती आपल्याला पाहिजे त्या रंगात आणि ढंगात रंगवता येते. जसा आपण स्वप्नातली राजकुमार किंवा राजकुमारी रंगवतो. म्हणून असाच अनोळखी चेहरा तुमच्या समोर सोडून जातो. म्हणजे मी तुमच्या मनात आणि जीवनात तुमच्या हक्काचा पाहिजे तसा व्यक्ती बनून राहील. धन्यवाद!
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा