लहानपण एकटेपणातच गेल्यानंतर मला तो भेटला. शाळेत माझी तुकडी बदलली आणि मी त्याच्या वर्गात गेलो. मी चौथीपासूनच एकटा शाळेत जायला लागलो होतो. त्याला त्याची आई न्यायला यायची. मी त्याच्या घराच्या जरासाच पुढे राहत असल्याने मी ही त्याच्यासोबतच जायचो. पुढे जशी जशी मैत्री वाढली तसा शाळा सुटल्यावर मी त्याच्या घरी जाऊन पुढे माझ्या घरी जाऊ लागलो. या मैत्रीमध्ये तरुणपण गेलं. त्याला क्रिकेटची आवड असल्याने मला सुद्धा जबरदस्तीने क्रिकेट शिकावे लागले. तो सिझन वर खेळत असल्याने मला सुद्धा सर्व शिकवत होता. ...