मराठी ही खूप छान भाषा आहे आणि सर्वात समजेल अशी भाषा आहे. मात्र आपल्याच भाषेचे अनेक प्रकारचे अर्थ निघतात. मग ते चांगले सुद्धा आणि वाईट सुद्धा. सच्चे वाचक समजून घेतात आणि ज्यांना समजून घ्यायचंचं नसेल ते स्वतःवर ओडून घेतात. मग त्या शब्दावरून वाद सुरू होतात आणि लिहिणाऱ्या व्यक्तीला स्पष्टीकरण द्यावं लागतं, सॉरी म्हणावं लागत, वगैरे वगैरे. ह्यात लिहिणाऱ्याला बहुदा हे ही माहीत नसतं की, समोरची व्यक्ती दुखावली जाईल. जे लोकं जाणीवपूर्वक भडकावू लिखाण करतात ते कधीच आपली चूक कबूल करतं नाही. लिखाणात चांगलं काय आहे? आणि वाईट काय आहे? हे वाचकांनी प्रामाणिकपणे सांगायला हवी, उगाच बाऊ करून आपल्यावर ओडून घ्यायला नको आणि वाद तर नकोच.🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा