॥ अवघा रंग एक झाला ॥
मनापासून जे सुचेल ते लिहिणारा तुमच्यातलाच एक मित्र , लेखक , कवी
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
मी तुपण गेले वाया । पाहता पंढरीच्या राया ॥
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
नाही भेदाचे ते काम । पळोनी गेले क्रोध काम ॥
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
देही असोनी विदेही । सदा समाधिस्थ पाही ॥
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
पाहते पाहणे गेले दुरी । म्हणे चोखियाची महारी ॥
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा