माझे पुर्ण नाव मच्छिंद्र त्रिंबक माळी .वैजापुर तालुक्यात स्थित भोकरगांव या गांवी एका शेतकरी कुटूंबात १ जुन १९५२ साली झाला.शेतजमिन बेताची असल्याने परिस्थिती हलाखीची.महाविद्यालयीन शिक्षण चालु असतानाच दि.२५ एप्रिल १९७५ या वर्षी पोलिस दलात नोकरी लागली. ३५ वर्षे सेवा करुन सहाय्यक पो.ऊप निरिक्षाक या पदी असतांना ३१ मे २०१० रोजी सेवानिवृत होऊन सध्या पेंशनर म्हणुन (पडेगांव ) औरंगाबाद याठिकाणी सहपरिवार जीवन व्यतीत करीत. मराठी , हिंदी व इंग्रजी भाषा ब-यापैकी जाणतो पण मराठी माझी मातृभाषा असल्याने तीविषयी विषेश प्रेम, आदर व आवड असल्याने कथा, कादंबऱ्या तसेच धार्मिक वाचन मोठ्या प्रमाणात झाले आहे आणि या छंदातुनच लेखनाचा अनावर झाल्याने अल्प प्रमाणात कथा , कविता लिहिल्या आहेत. नोकरीनिमीत्य ग्रामिन लोक जीवन जवळुन पाहण्यात आल्याने कथा लिखानाचा बाज काहीसा ग्रामीण आहे. बारा कथा समाविष्ट असलेला ' बोभाटा ' नावाने कथासंग्रह पुस्तक रुपाने यापूर्वी प्रकाशित झाला आहे.ईसाहित्य प्रतिष्ठान या वेबसाईटमार्फतीने जवळपास नऊ ईकथा प्रकाशित झाल्या आहेत. आपले ' प्रतीलीपी ' मार्फतीने कथा प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे.त्यासाठी आपल्या अनमोल सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपले सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद !
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा