कृपया तुमची आवडती भाषा निवडा
बाहेर आभाळ दाटून आलं होतं.. कुठल्याही क्षणी पाऊस पडेल असं वाटत असतानाच त्याचं बरसणं चालू झालं.. पावसाचं ते तांडव बघत असताना मन मात्र भूतकाळात चाललं होतं.. एक क्षण पुन्हा आला, घेऊन नभ आठवांचा...... ...
नाव : सौ .संतोषी केदार कदम (सई) जन्मतारिख : ०८ ऑगस्ट राहणार : ठाणे, छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे,रांगोळी काढणे,नाती जोडायला आवडतात त्या पेक्षा टिकवायला जास्त आवडतात हि आवड आहे जी आवड असेल ते मनापासून होते "हम आज भी इतने सालो बाद जब लिखते हैं, अपने कलम पर नाझ करते हैं........... "पराये लोग भी ,अपने बन जाते हैं , जब हमारे लब्ज मैंफिल मे कदम रखते हैं"...... जरासे मनातले ,... ------------------------------- मी लहान असताना लिखाण करायचे निबंध स्पर्धा ,कविता....... माझ्या वडिलांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले,सामाजिक विषयात लिहिण्यासाठी विचारांची उर्जा दिली. मी लिहित गेले ..जसे जमेल तसे ... आणि लिखाणाची हूर हूर मनाला स्पर्श करून गेली, तेव्हापासून आवड निर्माण झाली .विषय कोणताही असो जीव ओतून मांडायचा प्रयत्न असायचा . शालेय शिक्षण झाले , महाविद्यालयीन शिक्षण झाले ,काही वर्षे नोकरी केली ,२०१० ला लग्न झाले ,माझी छकुली २०११ ला झाली तिला वेळ देत देत .लिखाण मागे पडले .. गेल्या वर्षी माझ्या फेसबुक वर माझे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाचे सदस्य ..व्यतिरिक्त जास्त कोणीच जोडले गेले नव्हते . मी गेल्यावर्षी माझ्या जुन्या वहीतली एक कविता शेअर केली "माझ्या अहो " च्या सांगण्यावरून ... मला पहिला प्रतिसाद आला शब्दअंकुर, यांच्याकडून आणि जणू माझ्या या शब्दांना पुन्हा पुन्हा अंकुर फुटत गेले , साद-प्रतिसादाची पालवी फुटत गेली ....खूप छान वाटू लागले..मी आता लिहू शकते कि नाही यावरचा उडालेला विश्वास माझ्या लेखणीने मला पुन्हा मिळून दिला. वेगवेगळ्या ग्रुप वर मला काही अनोळखी मित्रामैत्रीनीने सामावून घेतले ते या लेखणीमुळे त्यांच्या ग्रुप मध्ये ...या प्रवासात मला अनोळखी वाटणारे केव्हा जीवाभावाचे झाले ते समजलेच नाही ....! खरेतर ,मला खूप जणांनी साथ दिली,स्पर्धेसाठी सहभाग घेताना काही समजले नाही तर आपणहून मला सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित इतरांच्या मानाने हे शुल्लक असेल पण माझ्यासाठी हि खूप मोठी गोष्ट आहे. मला आवडले असते, या प्रवासातल्या माझ्या काही नावांचा उल्लेख करणे , पण अनावधाने कोणाचे नाव चुकून राहून जाऊ नये याच अपेक्षेने मी आवर्जून कोणाचाही उल्लेख करू शकत नाही कारण माझ्यासाठी डावे ,उजवे काही नाही माझ्या मैत्री यादीत जी पण काही नावे आहेत.. हो अनोळखी असणारी माणसे आज मला माझ्या हक्काची आपली वाटतात ..ते फक्त या लेखणीमुळे ...... त्यांना मी धन्यवाद देते कि ...माझ्या लेखणीला तुम्ही गौरविले,माझे प्रेरणा स्थान झालात म्हणून मी आज पुन्हा लिहू शकले आणि यापुढे लिहित राहीन ....अखंड पणे ......... म्हणूनच म्हंटले अपने हो गये ,जो कभी पराये थे..... धन्यवाद ....मित्रानो, असाच लोभ असावा ....अखंडपणे तुमच्या सोबतीचा ....!!

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा