माझ्या विषयी सांगाव असं अप्रतिम व्यक्तिमत्त्व तर नाहिये पण एक असा वेडा मनुष्य जरूर आहे ज्याला आयुष्य अणि प्रेम त्यातला गोडवा त्यांच्या कल्पना करून ते जगण्याची पद्धत कशा पद्धतीने अजून सुंदर होईल ह्याचा शोध घ्यायला आवडतो,
खूप काही नाही पण आयुष्य जगताना प्रेम किती महत्वाचं आह़े , मनाच्या कोपर्यात दडलेल्या ह्या लडिवाळ कल्पना शब्दांच्या स्वरुपात मांडताना येणारा अनुभव अणि हळू हळू मनातल्या व्यक्त होणार्या भावनांत वाहत जात असताना जगाची झालेली ओळख खूप काही शिकवत जाते ते शिकून जगायला मला आवडत..,
जास्त सांगण्यासारखं अस काही नाही पण आयुष्य, प्रेम अणि मनाच्या कल्पनांत वाहत जायला आवडतं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे ते प्रत्येकाने तितकंच मनमुरादपणे जगाला पाहिजे त्यातल्या एक एका सेकंदातील आनंद अणि सुखी क्षण वाया घालवायला नको इतकंच 👈😘
समस्या नोंदवा