माझी शब्दांची दुनिया ✍️🥰❤️
*माझ्या पूर्ण झालेल्या कथा..
१) मायेचा पदर - नात्यांचे पदर उलगडणारी एक हलकीफुलकी कौटुंबिक कथामालिका💝
२) नको नको म्हणताना (१०भागांची कथा मालिका आव्हानातील विजेती कथा आणि लिपीवरील पहिलेच बक्षीस मिळवून देणारी कथा) ❤️
मनी ध्यानी नसतानाही सुरु झालेला प्रेमाचा प्रवास दर्शवणारी ही एक मजेशीर प्रेमकथा मालिका 💞
३) तिढा..गूढ मृत्यूचे - एक प्रेमीयुगुलाची हत्या की आत्महत्या याचा तिढा सोडवणारी एक रहस्यमयी क्राइम थ्रिलर कथा.
४) सांसारिक कथा..नात्यांची अनोखीवीण- सर्वांना आपल्याशा वाटणाऱ्या आणि विशेष करून सासू- सून वर्गाच्या भावनांचा आढावा घेणाऱ्या जलद कथांचा संग्रह 🥰
५) प्रेरणादायी लघुकथांचा संग्रह - दैनंदिन जीवन जगत असताना सामाजिक निरिक्षणातून सुचलेल्या आणि विशेष करून स्त्री वर्गाच्या भावनांची जपणूक करणाऱ्या लघुकथांचा संग्रह ☺️
६) प्रेमकथा संग्रह- छोट्यामोठ्या अशा प्रेम कथांचा संग्रह 💖
(त्यातीलच एक "सागराला ओढ किनाऱ्याची.." ही वाचकांच्या पसंतीस उतरलेली आणि माझी पहिलीच दहा भागांची कथा🥰)
७) सामाजिक लघुकथा संग्रह - समाजातील चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या सामाजिक कथांचा संग्रह.
८) अनोळखी दिशा - पहिल्यांदाच सुपर लेखक ६ मध्ये धाडस करुन भाग घेतला पण दीर्घकथा लिखाणाचा जास्तीचा अनुभव नसल्याने अगदी सुचेल तसे लिहित गेले आणि कथेचे ८४ भाग पूर्ण केले. पण ह्या कथेमुळेच माझा दीर्घकथा लिखाणाचा अनुभव दृढ झाला आणि पुढच्या उत्तम कथांचा जन्म झाला.😍
*सुरु असलेल्या कथा...
१) अधीर मन झाले - मोठ्या जिद्दीने सुपर लेखक ८ साठी ही कथा सुरू केली होती पण पुढे खूप अडथळे आले. मुलांची आजारपणं, eyes infection या आणि अशा अनेक कारणांमुळे ही कथा अजूनही सुरूच आहे. पण ती लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या कथेला मिळणाऱ्या वाचकांच्या प्रतिसादासाठी सर्वांचे मनापासून आभार☺️🙏
२) गंध प्रितीचा - सुपर लेखक १० या शेवटच्या सीझनसाठी यावेळीरदेखील जिद्दीने कथेला सुरुवात केली आहे. तुमच्या आशिर्वादाने आणि साथीने ती पूर्ण करण्याचा मानस आहे. ह्यावेळी तरी लिखाणात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्यात.
प्रिय वाचक वर्ग आतापर्यंत जशी मला साथ दिली तशीच यापुढेही तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. आजच(८.४.२५) माझे १००० followers पूर्ण झाले. सर्व followers आणि वाचक वर्गाचे त्यासाठी मनापासून आभार 💗🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा