pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

छावा संभाजी राजे आणि सत्य !

4.6
11779

छत्रपती संभाजी महाराजांवरील आरोपांची सप्रमाण चिरफाड मराठयांच्या गौरवशाली इतिहासातील सुवर्णअध्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जगातील ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
डॉ. शांताराम कारंडे

अष्टपैलू व्यक्तिमत्व : डॉ. शांताराम पांडुरंग कारंडे कोण म्हणतं की श्रीमंत हा अतीश्रीमंत होतो आणि गरीब हा गरीबच राहतो. मेहनतीला, स्वकर्तृत्वाला व ध्येयाने पछाडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीला सोबत नशिबाची साथ असेल तर तो कितीही गरीबीतून आला असेल तरी यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचल्याशिवाय राहत नाही. मेहनतीला कधी ना कधी यश मिळतेच. सर्वांच्याच बाबतीत घडते, असेही नव्हे. खूप कमी लोक असतात ज्यांच्याकडे सरस्वती व लक्ष्मीचा वरदहस्त असतो. अशा भाग्यवान लोकांपैकीच एक म्हणजेच प्रसिद्ध लेखक, कवी व साहित्यिक असलेले समाजसेवक *डॉ. शांताराम कारंडे* व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असलेले डॉ. कारंडे यांच्याकडे सरस्वतीचा वावर म्हणजेच त्यांची मराठी साहित्यावर असलेली जबर पकड. त्यांच्या चारोळ्या , कवितासंग्रह, कथा व वर्तमानपत्रातून नियमित स्तंभ लेखन. मराठी मुद्दयांवर लिहलेले त्यांचे बरेच लेख गाजले आहेत. मनाने कवी असलेला माणुस आपल्या कवितेवर इतकं प्रेम करतो की आतापर्यंत प्रकाशित केलेले काव्यसंग्रह विना मोबदला घेता प्रकाशित केले आहेत. व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून ही व्यक्ती समाजकारणा सोबत राजकारणात सुद्धा अग्रेसर आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे म्हणूनच अवघ्या दोन तासात 'मनसे' या आद्याक्षरावर त्यांनी ४० चारोळ्या लिहून 'अंगार' नावाने प्रकाशित केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असणारे श्री. कारंडे हे समंतर्पणे समाजसेवाही देखील करत असतात. बऱ्याच सेवाभावी संस्थांना सढळ हस्ते मदत करणारे म्हणून ते ज्ञात आहेत. नुकतेच त्यांनी वसंतराव भागवत विद्यालयाला जवळ जवळ ८० हजार रुपये किंमतीचे बेंचेस दान केले. तसेच बऱ्याच सामाजिक कार्यक्रमाचे ते आयोजन करतात व नवयुवकांना संधी उपलब्ध करून देतात. नुकतेच पुणे येथे त्यांनी ' नक्षत्राचं देणं काव्यमंच' तर्फे आखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन -२०१० या कार्यक्रमाचे आयोजन केले ज्याचे अध्यक्षपद कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांनी भूषवले. धारावी सारख्या झोपडपट्टीतून म्युन्सिपल मराठी शाळेतून शिकून या युवकाने खूप कमी वेळात यशाचे, किर्तीचे उत्युंग शिखर गाठले. इतके करून हा युवक इथे न थांबता एका शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त म्हणून लवकरच इंजिनिअरींग कॉलेज सुरु करीत आहे. ' सिद्धांत प्रकाशन' या मालकीच्या प्रकाशन संस्थेद्वारे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित करीत असून ' रयतेचा वाली' हे साप्ताहिक नियमितपणे चालवित आहे. या सर्वांची दखल घेऊनच श्रीलंकेच्या कोलंबो विद्यापिठाने डॉ. कारंडे यांना डॉक्टरेट बहाल केली. अनेक मान्यताप्राप्त संस्थानी, संघटनांनी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. ई. टी.व्ही. वर 'संवाद' या कार्यक्रमामध्ये पत्रकार राजु परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. असे हे व्यक्तिमत्व खरोखर अष्टपैलू व्यक्तीमत्व असून अजुन त्यांचे पाय जमीनीवर आहेत.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    DHYAN DE
    26 സെപ്റ്റംബര്‍ 2019
    नमस्कार जय शिवराय..🚩 तुम्ही जो लेख लिहला आहे . तो आम्ही आमच्या youtude व्हिडिओ मध्ये वापरू शकतो का..? त्याचं तसं आम्ही आमच्या व्हिडिओच्या सुरवातीला तुमचं नाव व प्रतीलीपी चा नाव देऊ .आणि तुमची लिंक पण disacrishon मध्ये टाकू. त्या मुळे तुमच्या चॅनल चा पण फायदा होईल. आणि लोकं तुमचं चॅनल ला येऊन भेटतील. तसेच आपला इतिहास पण संपूर्ण जगासमोर येईल...🙏 तुम्हाला काय वाटं आम्हाला सांगा तसं आम्ही करू...🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
  • author
    Arun Awhad
    23 ഒക്റ്റോബര്‍ 2018
    खूप छान माहिती .ज्या ज्या वेळेस ब्राह्मण सत्तेत आले त्या त्या वेळेस खरा ईतिहास लपवून खोटा ईतिहस लिहून जनतेची दिशाभूल केली म्हणून यांनी लिहिलेल्या सर्वच ग्रंथ थोतांड वाटतात
  • author
    आनंद
    15 ജൂണ്‍ 2018
    शिवबाचा छावा :- माझा शंभू राजा ⛳️ जय शंभूराजे ⛳️
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    DHYAN DE
    26 സെപ്റ്റംബര്‍ 2019
    नमस्कार जय शिवराय..🚩 तुम्ही जो लेख लिहला आहे . तो आम्ही आमच्या youtude व्हिडिओ मध्ये वापरू शकतो का..? त्याचं तसं आम्ही आमच्या व्हिडिओच्या सुरवातीला तुमचं नाव व प्रतीलीपी चा नाव देऊ .आणि तुमची लिंक पण disacrishon मध्ये टाकू. त्या मुळे तुमच्या चॅनल चा पण फायदा होईल. आणि लोकं तुमचं चॅनल ला येऊन भेटतील. तसेच आपला इतिहास पण संपूर्ण जगासमोर येईल...🙏 तुम्हाला काय वाटं आम्हाला सांगा तसं आम्ही करू...🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
  • author
    Arun Awhad
    23 ഒക്റ്റോബര്‍ 2018
    खूप छान माहिती .ज्या ज्या वेळेस ब्राह्मण सत्तेत आले त्या त्या वेळेस खरा ईतिहास लपवून खोटा ईतिहस लिहून जनतेची दिशाभूल केली म्हणून यांनी लिहिलेल्या सर्वच ग्रंथ थोतांड वाटतात
  • author
    आनंद
    15 ജൂണ്‍ 2018
    शिवबाचा छावा :- माझा शंभू राजा ⛳️ जय शंभूराजे ⛳️