pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

संजु आक्का

6391
4.1

मी साधारण ४ वर्षाचा असतानाची ही गोष्ट आहे. त्या वेळी आजी, आजोबा, आम्ही चौघं भावंडं आणि आमची आत्या (वडिलांची मावस बहीण) जिला आम्ही संजु आक्का म्हणायचो, आम्ही एकत्र राहायचो. माझे आई वडील, शंकर काका आणि काकी त्या वेळी ऊस तोड कामगार म्हणुन कारखान्याला गेले होते. संजु आक्का च्या घरचे पण सगळे कारखान्याला गेले होते त्यामुळे ती आमच्या कडेच होती राहायला. तसेही वडीलांना सख्खी बहीण नव्हती त्या मुळे तिचे खुप लाड व्हायचे. आजी, आजोबा रानात कामाला जायचे आणि आम्ही संजु आक्का सोबत घरीचं राहायचो. शाळेत नाव घातलं ...