अश्विनी ना. राठोड
मी अश्विनी राठोड एक कमी शिकलेली मुलगी..
परिस्थितीपेक्षाही मनस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं असं म्हणेन, कारण परिस्थिती मी बदलू शकले असते. पण मनस्थिती बदलवणार त्या वेळेस कुणी नव्हतं. बाबांच्या अवेळी निधनाने जीवनात अनेक चढ उतार आले. पण आता आम्ही भावंडं सावरलोय आणि आता स्वतः ला घडवण्याचा प्रयत्न करतोय.
वेळ मिळेल तसा, नवीन नवीन पुस्तके वाचण्याची आवड मला लहानपणापासूनच आहे.कारण बाबांनीच मला पुस्तकांची गोडी लावली होती...प्रत्येक पुस्तकात मला माझ्या बाबांच प्रतिबिंब दिसतं.. आणि ते माझ्याच जवळ आहेत याची जाणीव मला होते... आणि त्याचमुळे
थोडं फार लिहीण्याचाही प्रयत्न करत असते. 🙏
माई सिंधुताई सपकाळांना आणि माझ्या लाडक्या शिक्षिका
सौ. ऋजुता तायडे यांना आदर्श मानते.💐💐
आणि सगळ्यात जास्त आपल्या परिवारावर प्रेम करते... 😊😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा