गहिरा अर्थ आहे काही वेगळे काय ?
स्तब्ध शब्द नि मौन हे काय ?
लागले जीव त्या शब्दात काही
ओलावले शब्द नि यमक हे काय ?
अर्धवट राहिली कविता माझी
सारेच पूर्ण नि आयुष्य हे काय ?
देह आपले नव्हते केव्हा
आत्मा तुझा नि माझा काय ?
जीव सार्थ कविता माझी
हृदय माझे नि जिवलगा काय ?
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा