१० वी ला १९८७ साली शिकत असताना माझा वयाने मोठा असलेला मित्र श्री. सुमंत आयाचित पत्रकारीतेच्या माध्यमातून लिखाण करीत असे त्याला फाॅलो करुन लिखानाची आवड निर्माण झाली. माझे मोठे मावस मामा *कै. प्रा. भगवान काळे* जालना येथे लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार व मोठे लेखक होते तसेच लहान मामा *कै.अनंत काळे* हे अौरंगाबाद आकाशवाणीला समालोचक आणि प्रसिध्द कवि असल्यामुळे माझ्यासाठी ते लिखाण आणि काव्यातील आदर्श तसेच प्रेरणास्थान राहीले त्यांच्यामुळेच १९८८ पासून मी लिखाण आणि काव्य करु लागलो आहे. १९८९ ला १२ वी झाल्यानंतर जवळपास १७ वर्ष स्थानिक दैनिकांमधून पत्रकारीता व संपादकीय विभागातील जवाबदारी समर्थपणे निभावली. लिखाणाची काव्य करण्याच्या सातत्यामुळे हळूहळू लिखाणात धार येत गेली. "मुकुंदसुत" नावाने काव्यरचना करताना खुप आनंद घेत आहे. या तिघांच्या माझ्या मनावर असलेल्या प्रभावामुळे हे सर्व करु शकलो आहे. मी जन्मभर त्यांचा आभारी राहीन.
समस्या नोंदवा