दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. तो खूप दूर वरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते. काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली. एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला. त्याचा घोडाही धन्याच्या या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला. १५/२० पावलातच रावजीने दरवाज्यावर थाप मारली आणि परत काही पावले मागे येऊन उभा राहिला. जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाज्याच्या वरच्या बाजूला असलेली छोटीशी झडप उघडली गेली. ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा