pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

निकाल - भूलभुलैया

27 ଜୁନ 2019

नमस्कार लेखकवर्ग,

जवळपास दीड महिना सुरू असणाऱ्या या भूलभुलैया स्पर्धेने लेखक आणि वाचकांना चांगलेच भुलवले आहे. भयकथा, रहस्यकथा यांना प्रतिलिपिवर नेहमीच मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. तरीही  मानवी मनाच्या थोड्याशा गडद अशा एका पैलूचा वेध घेणाऱ्या चित्तवेधक तरीही मनोरंजक अशा कथा लिहिताना भुतंखेतं, चाटकमाटक, खून, हत्याकांड, अपहरण, सूड, बदला, पुनर्जन्म अशा अतर्क्य आणि रहस्यमय घटनांमागचं गूढ उकलू पाहणारे कथानक येथे अपेक्षित होते. नकारात्मक, भयावह तरीही डोळ्याची पापणी न हलू देता मानवी मनाला तासन तास खिळवून ठेवणाऱ्या अनेक कथा या स्पर्धंच्या निमित्ताने वाचायला मिळाल्या. काही कथानकांनी मात्र भीतीने मला पूर्णपणे घेरून ठेवले होते. अगदी डोळ्याची झोप उडवली होती. काही काही कथा वाचून तर या कथा आहेत. त्यात कल्पनेचा भाग असतो, याचाही मला विसर पाडला होता. एक मात्र आवर्जून नमूद करावेसे वाटते काही लेखकांनी मात्र भूलभुलैया ही संकल्पना नीटशी समजून न घेता सरसकट भयकथा अथवा रहस्यकथा स्पर्धेसाठी लिहिलेल्या आहेत. 

या स्पर्धेमध्ये २६९ कथा सहभागी झाल्या होत्या. पुण्यातील वेलिंग नाडकर्णी आणि ओंकार रेगे या दोन मान्यवरांनी परीक्षणाचे आव्हानात्मक काम परिश्रमपूर्वक पार पाडले आहे. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. कथालेखनाची संकल्पना, गुणवत्ता आणि व्याकरण या निकषांवर आपल्या कथांचे परीक्षण करण्यात आले आहे. 

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

प्रतिलिपि आयोजित ' भूलभुलैया ' स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
 
वाचकसंख्या, साहित्यावर वाचकाने घालवलेला वेळ आणि रेटिंग ह्या तीन निकषांवर टीम प्रतिलिपिचा निकाल खालीलप्रमाणे :
 

प्रथम क्रमांक

 होतं असं कधी कधी ......

मिलिंद अष्टपुत्रे

होतं असं कधी कधी ...... 

द्वितीय क्रमांक

 झपाटलेली बायको

नितेश ठोकळ

झपाटलेली बायको

तृतीय क्रमांक:

 भीतीचा स्पर्श  ! (तिचा तुमच्यात प्रवेश निश्चित आहे.)

डॉ प्रेरणा पारवे

भीतीचा स्पर्श  ! (तिचा तुमच्यात प्रवेश निश्चित आहे.)

चतुर्थ क्रमांक

भुताटकी

प्रणाली देशमुख

भुताटकी

पाचवा क्रमांक

 लुम्बीनी- एक गिळंकृत वमनविद्या

संतोष देशपांडे

लुम्बीनी- एक गिळंकृत वमनविद्या

कथानक, लेखनाची गुणवत्ता, व्याकरण ह्या तीन निकषांवर परीक्षकांच्या टीमचा निकाल खालीलप्रमाणे :

प्रथम क्रमांक

 पाऊलखुणा

राजश्री-बर्वे

पाऊलखुणा

द्वितीय क्रमांक

 टिंडर

मयूर सानप 

टिंडर  (Tinder)

तृतीय क्रमांक:

मनःपिशाच्च

यशश्री रहाळकर

मनःपिशाच्च

चतुर्थ क्रमांक:

एक प्रवास जीवघेणा

शैलेश कांबळी

एक प्रवास जीवघेणा

पाचवा क्रमांक

समांतर

मेघा जोशी

समांतर

 

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन !

प्रथम पाच विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल.

 

अधिक माहितीसाठी वाचा:  

How we select Top winners:

The column headings in green are the absolute values of parameters, which we take into consideration -

j) Read count - Total 50% read count of the content in the date range 
ii) Ratings count - 25% of ratings 
iii) Avg Rating - Average rating 
iv) Reading time taken ( in seconds) - Actual average time spent on the content, by the readers
v) Actual reading Time (sec) - 25% of How much time does it generally take for anyone to read the content fully
vi) Time factor - ratio of iv) and v) - The higher, this parameter is, it means that readers are actually spending the right amount of time to finish the content fully. In other words, content completion rate is more. 
The column headings in blue are normalization factors - ie) Trying to bring each of the previously mentioned parameters (Read count, Avg rating, Rating count, Time factor), into a single linear scale.

Final mark - Weighted average of the normalized factors. 

 

 

 

 

 

पाऊलखुणा