pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Top 10 marathi stories to read /वाचण्यासाठी टॉप 10 मराठी कथा

मित्रांनो, "प्रतिलिपि" ॲप हे लेखक आणि वाचकांना जोडणारे एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून तरुण आणि अनुभवी लेखक त्यांच्या काल्पनिक क्षमतांचे प्रदर्शन करून वाचकांचे मनोरंजन करतात. या लेखाद्वारे, आम्हाला आमच्या मराठी लघुकथा (Marathi stories) प्रदर्शित करायच्या आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अनेक मराठी लघुकथा आमच्या व्यासपीठावर आधीच लोकप्रिय आहेत.

1 . दि रुथ लॅन्ड (The Ruth land)

समजा कधी तुम्ही रात्री नेहमीप्रमाणे झोपलात आणि सकाळी उठून स्वतःला एका अनोळखी निर्जन बेटावर वर पहिले तर तुम्हाला काय वाटेल? अगदी तेच या कथेच्या नायकलासुद्धा वाटते. तुम्हाला एक वेगळ्या दुनियेची सैर करण्यासाठी घेऊन जायला आम्ही आलो आहोत, काय मग तुम्ही तयार आहात ना?

हि गोष्ट एका अशा खेळाची आहे ज्यामध्ये जो कोणीही निवडला जातो त्याला 'रुथलॅन्ड' वर नेलं जातं. या जागेवर खूप रहस्ये दडलेली आहेत. या जागेवर जो एकदा जातो त्याचे पुन्हा सामान्य आयुष्यात परतणे अशक्यच! दुर्दैवाने आपला नायकही या जागी पोहचला आहे अर्थात, पुन्हा कधीही परतून न येण्यासाठी!!

तर तिथे त्याच्यासोबत नेमके काय झाले असेल? तो रुथलॅन्डमध्येच अडकला असेल की तिथून यशस्वीपणे बाहेर पडू शकेल? हे जाणून घ्यायला वाचा ,दि रुथलॅन्ड' ही कथा. एका अगदी नवीन विषयावर आणि ठरविकपणे जर तुम्ही भय आणि प्रेम शैलींचा योग्य संगम असणारी कथा शोधात असाल तर ही कथा (Marathi stories) तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल. कथा वाचण्यासाठी 'प्रतिलिपि' ॲप आताच डाउनलोड करा.

त्वरित वाचा

2. चित्रविचित्र (Chitravichitra)

ह्या गोष्टीची (Marathi stories) नायिका 'ईश्वरी' आहे. जिला एक भन्नाट गोष्ट सुचते आणि ती गोष्ट ती लिहिते. इथूनपुढे सुरु होतो एक थरारक खेळ! ईश्वरीने लिहिलेली गोष्ट आपोआप खरी व्हायला सुरुवात होते ज्यामध्ये तिचे खऱ्याखुऱ्या आयुष्यतील भाऊ - बहीण मृत्यू पावतात. या घटनांनी एकाकी पडलेल्या आणि भेदरलेल्या ईश्वराला अचानक एके दिवशी 'अन्वय' भेटतो आणि त्याला ती तीने लिहिलेली गोष्ट दाखवते व त्याबाबत कोणासमोरही उघड न केलेल्या अभद्र सत्याचा खुलासा करते.

एक सामान्य मुलगी असूनही ईश्वरी सोबत या घटना का घडत होत्या? काय आहे या गोष्टीमागचे रहस्य? अन्वय तिला या संकटापासून वाचवू शकेल? रहस्य, भय, थरार आणि रोमान्सन शैलीचे अनोखे मिश्रण असलेली ही एक गोष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की, तुम्हाला हि गोष्ट नक्कीच खूप आवडेल! तर आजच डाउनलोड करा (Marathi stories) 'प्रतिलिपि' ॲप आणि वाचा ‘चित्रविचित्र’.

त्वरित वाचा

3. टाईप रायटर (Typewriter)

एक मुलगा ज्याला एक जादुई टाईपरायटर मिळतो, ज्यामध्ये आहे एक विशेष अफाट शक्ती आणि जादू! पण जादू चांगली कि वाईट हे तर तिला वापरणारच ठरवू शकतो.

दुर्दैवाने ज्या मुलाला हा टाईपरायटर मिळाला आहे, तो वाईट वृत्तीचा मनुष्य असून टाईपरायटरच्या जादुई शक्तीचा गैरवापर करत आहे. या कथेचा नायक सीबीआय अधिकारी 'आदित्य' एकामागून एक होणाऱ्या निर्घृण खुनांमुळे बैचेन आहे. कोणताही पुरावा मागे न ठेवता गुहेगार इतक्या सफाईने खून कसा करत असावा या विचाराने आदित्य हैराण आहे. आणि हीच गोष्ट (Marathi stories) त्याला आश्चर्यचकित करत आहे.

आदित्य हे गूढ रहस्य शोधून काढू शकेल की हे खुनांचे सत्र असेच चालत राहणार आहे? टाईपरायटरचे पुढे काय होईल? भय, रहस्य, प्रेम आणि थराराने ओतप्रोत भरलेली गोष्ट (Marathi stories) 'टाईपरायटर' आवर्जून वाचा. कथा वाचण्यासाठी आजच तुमचे 'प्रतिलिपि' ॲप डाउनलोड करा.

त्वरित वाचा

4. पिसावळ (Pisaval)

केदार या गोष्टीचा नायक, ज्याचे वडील २ वर्षांपूर्वीच वारले आहेत. त्यातच आता आई सुद्धा वारल्यामुळे आपण आता अनाथ झालो आहोत या भावनेने त्याला पोखरून काढले आहे. याचदरम्यान घरात त्याला एक पत्र सापडलेय, जे त्याच्या आजोबांनी त्याच्या वडिलांना पाठवले आहे आणि मदतीसाठी ते वडिलांना गावी बोलवत आहेत. आपल्या मुलाचे निधन झाले आहे यापासून केदारचे आजोबा अनभिज्ञ आहेत का? आजोबा नक्की कुठे आहेत?

केदार त्याचे मित्र आणि प्रेयसी संध्यासह दुर्गादेवीला दर्शनासाठी आला आहे. इथे त्याला कळते की, त्याच्या गावावर एका भयानक सैतानी ताकदीने कब्जा केला आहे आणि त्याच गावात त्याचे आजोबा एकाकी राहत आहेत.

आजोबांचा जीव वाचवण्यासाठी केदार त्या सैतानी ताकदीचा सामना करू शकेल की यामध्ये तो स्वतःचाच जीव गमावून बसेल? जाणून घ्यायला वाचा भय, रहस्य आणि थराराने भरलेली जबरदस्त कथा 'पिसावळ' फक्त 'प्रतिलिपि' ॲप वर.

त्वरित वाचा

5. महिमारची सफर (Mahimaar safar)

महिमार एक जादुई जहाज, ज्यामध्ये अपार शक्ती आहे! हे जहाज शुभ्र आणि सोनेरी रंगाचे आहे. ह्या जहाजची खासियत हि आहे कि, ते दर दोन दशकातून एकदा आपल्या खऱ्या मालकाला शोधायला येते आणि जर तो नाही मिळाला तर, ते जहाज पुन्हा समुद्राच्या तळाशी जाऊन विसावते.

'सोलोमोन' या गोष्टीचा खलनायक आहे. ज्याला ते जहाज आणि त्याची सगळी शक्ती हवी आहे. परंतु, जहाजाला आपला मालक म्हणून केवळ चांगल्या मनाचा आणि शुद्ध वृत्तीचा माणूस हवा आहे.

'सिकंदर' या कथेचा नायक ज्याला सोलोमोन मारायचा पुरे पूर प्रयत्न करतो आहे. सिकंदर सोलोमोनच्या तावडीतून वाचेल का? काय या जहाजाला त्याचा खरा मालक सिकंदर भेटेल? रहस्यमय आणि एका वेगळ्या जगाची गोष्ट "महिमारची सफर" वाचायला आताच डाउनलोड करा 'प्रतिलिपि' ॲप.

त्वरित वाचा

6. रुद्राय राघव अग्निहोत्री (Rudray Raghav Aghnihotri)

ह्या कथेचा नायक 'रुद्राय राघव अग्निहोत्री' जो कि एका मुलीवर नितांत प्रेम करतो. पण ती मुलगी एक सामान्य मुलगी नाही तर, एक वैश्या आहे हे त्याला जेव्हा कळते तेव्हा तो तिचा तिरस्कार करू लागतो. त्याला तिची घृणा वाटू लागते.

'जानकी शास्त्री' ह्या कथेची नायिका सुद्धा रुद्राय वर खूप प्रेम करते. मग तिच्या आयुष्यात असे काय घडले ज्यामुळे तिला वैश्या बनावे लागले?

आम्हाला खात्री आहे कि, सुंदर पद्धतीने रेखाटलेली, प्रेम रहस्य आणि रोमान्सने भरलेली कथा 'रुद्राय राघव अग्निहोत्री' वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. कथा वाचण्यासाठी आताच डाउनलोड करा 'प्रतिलिपि' ॲप.

त्वरित वाचा

7. अपराधी मी (Apradhi mi)

ह्या गोष्टी चा नायक 'कबीर' हा देखणा आर्मी ऑफिसर आहे. नायक 'समीरा' या भोळ्या आणि सुंदर स्त्रीशी लग्न करतो. या लग्नामुळे समीरा खूप आहे. परंतु, अचानक एके दिवशी कबीर तो नपुंसक आहे हे आपले सत्य तिला सांगतो. हे एकूण समीराच्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. आणि जेव्हा तिला हे समजते की, तिला कबीरचा चुलत भाऊ राहुल पासून मूल होणे आवश्यक आहे तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि आयुष्यात अंधार झाल्याची तीव्र जाणीव तिला होते. अनेक दिवस नकार दिल्यानंतर, तिची प्रेमाची आस आपसूकच तिला राहुलच्या जवळ नेते. लवकरच, समीरा राहुलसोबत समाधानाने एकत्र राहण्यासाठी पळून जाते. पण जेव्हा कबीरला समजते की, समीरा राहुलपासून गरोदर आहे तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक गंभीर वळण येते.

काय समीरा कबीरला परत स्वीकारेल कि राहुल सोबतच पूर्ण आयुष्य जगायचं ठरवेल? जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा 'प्रतिलिपि' ॲप आणि वाचा कथा 'अपराधी मी'.

त्वरित वाचा

8. शिवांश - एक शापित पुत्र (Shivansh ek shapit putra)

कमलताई नावाची एक मुलगी जी कि एका असाधारण मुलाला, 'शिवांश' ला जन्म देते. हा मुलगा जेव्हा मोठा होतो आणि कॉलेजला जातो तेव्हा त्याला वाटते कि मला एका महत्वाच्या विषयावर प्रकल्प केला पाहिजे आणि यासाठी तो कैलास पर्वतावर जाऊन पोहचतो. इथे त्याला एक व्यक्ती भेटते जी दुसरी तिसरी कोणी सामान्य व्यक्ती नसून स्वतः श्री परशुराम असतात. ते त्याला आपल्याबरोबर घेऊन जात असताना शिवांशला सारखे वाटत आहे कि त्याने स्वप्नामध्ये या व्यक्तीला पाहिलेले आहे.

ते त्याला त्याच्या जन्माचा रहस्य सांगतात. शिवांश हा साक्षात अश्वत्थामाचा पुत्र आहे आणि ते त्याला मुक्त करायला पृथ्वीतलावर आलेले आहेत. हे साध्य करण्यासाठी त्यांना 'मांत्रिक' या व्यक्तीचा नायनाट करायचा आहे जो या कथेचा खलनायक आहे. मांत्रिकाच्या जीवनाचे एकाच लक्ष्य आहे ते म्हणजे, कलियुगाचा देव 'कल्की' याचा वध करणे!

काय शिवांश या लढाईमध्ये जिंकू शकेल? आपल्या वडिलांना यातून मुक्त करू शकेल कि मांत्रिक शिवांशला मारून टाकेल? आम्हाला माहित आहे की, तुम्हाला ही गोष्ट वाचायला खूप आवडेल. रहस्य, रोमांच आणि जादूच्या गोष्टी वाचायला आजच डाउनलोड करा 'प्रतिलिपि' ॲप.

त्वरित वाचा

9. भदाळी (Bhadali)

जर तुम्ही कधी अशा एक ठिकाणी गेले जिथे तुमचे पूर्वीचे काही संबंध आहेत तर? जे भास तुम्हाला होतील तेच ह्या कथेतल्या नायकलाही होत आहेत. अमोघ, मेटाफिजिकल सायकॉलॉजीचा तरुण अतिशय उत्साही आहे. त्याला नवनवीन शोध लावायची खूपच आवड आहे. तो जेव्हा हनीमूनला भदाळी नावाच्या एका रहस्यमय पॅलेसमध्ये जातो तेव्हा, तिथे त्याला खूप विचित्र अनुभव यायला सुरुवात होते. अमोघ या अनुभनमुळे चांगलाच घाबरतो. सुदैवाने तेथे त्याला एक वीरभद्र नावाचा मनुष्य भेटतो जो देवाचा निस्सीम भक्त आहे. जो अमोघला भदाळीचा इतिहास आणि अमोघशी असलेल्या त्याच्या पूर्वीच्या संबंधांबद्दल सविस्तर माहिती देतो.

भदाळी सारखी विलक्षण आणि थरारक कथा आजवर वाचली तुम्ही नसेल. आम्हाला माहित आहे कि तुम्हाला हि गोष्ट खूप आवडेल. गोष्ट वाचण्यासाठी आजच डाउनलोड करा 'प्रतिलिपि' ॲप.

त्वरित वाचा

आमच्या मराठीतील काही निवडक मराठी कथा (Marathi stories)येथे आहेत. पण तुम्हाला अशा आणखी मराठी कथा वाचायच्या असतील, तर आजच “प्रतिलिपि” ॲप डाउनलोड करा आणि अनेक सुविधांचा आनंद घ्या. रहस्य, रोमांच, गुप्तहेर, कादंबरी आणि थराराने परिपूर्ण मराठी गोष्टी तुम्हाला वाचायला हव्या असतील तर आजच डाउनलोड करा मराठी गोष्टी करता'प्रतिलिपि' ॲप.