दहा वर्षांनंतर आज ते दोघं भेटणार होते. तिने त्याला भेटायला बोलावलं होतं. ठिकाण पण तिनेच ठरवलं होतं, 'मस्तानी तलाव',जिथे ते दोघे बारा वर्षांपूर्वी पहिल्यांदा फिरायला गेले होते. पण तो अजून आला नव्हता. ती तिथलेच लहान लहान खडे उगाचच पाण्यात फेकत पाण्यावर उठणा-या तरंगांकडे पाहत बसून राहिली. तिच्या मनात पण आत्ता कुठल्या कुठल्या विचारांचे तरंग निर्माण होत असतील का?? तिची व्हाईट मर्सिडीस झाडाखाली लावली होती. गाडीजवळ ड्रायव्हर दिसत नव्हता म्हणजेच ती स्वतः ड्रायव्हिंग करत आली होती. गाडीच्या मागच्या ...

