मी सौ.गायत्री शैलेश कुलकर्णी...
माझी जन्मतारीख २५ नोव्हेंबर.☺️
सगळ्यांत आधी वाचकांना नम्र विनंती की कुणीही माझे लेखन कॉपी पेस्ट करुन इतर कुठे टाकु नये..
माझ्या प्रत्येक लिखाणाला कॉपी राईट आहे त्याच सोबत माझे लेखन माझे स्व - लिखित आहे...
"माझ्या मते लिखाण म्हणजे,मनात विचारांचे जे प्रचंड वादळ निर्माण झालेले असते ते शांत करण्यासाठीच असते असे मला वाटतं"कारण ज्या गोष्टी आपण कुणाला सांगू किंवा बोलु शकत नाहीत,त्या गोष्टी आपल्या लिखाणातून आपण लिहू शकतो..
आणि खरंच आहे जेव्हा आपण काही लिहितो तेव्हा त्या वादळाला शांतता मिळते....
मी एक व्यावसायीक आहे,ब्युटीशीयन आहे,वेगवेगळे क्लासेस घेते तसंच वेगवेगळे ग्रुप,पेज,शेरोशायरी,तर आहेच,पण त्यासोबतच माझे YouTube channel आहे Gayatri Kulkarni's पाककला नावाचे ..
मला अनेक छंद आहेत.
त्यातलाच एक छंद लिखाण,वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करणं मला खूप आवडते..
सामाजिक,कविता,सुविचार....
अशा वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला ज्या कथा वाचायला मिळणार आहेत त्यात काही अनुभव,काही सत्य आणि काही काल्पनिक अशा असतील.
तरी तुम्हाला नम्र विनंती आहे की कथा वाचा आणि कमेंट करा.
तुम्हाला जे काय वाटेल ते चांगले वाईट मला तसे स्पष्ट सांगा.
तुम्ही केलेले कमेंट मला प्रेरणा देणारे आहे..
कारण त्यामुळे माझे लिखाण अजून चांगले होऊ शकते...
धन्यवाद
🙏🙏
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा