pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

रहस्य कथा | Suspense Stories in Marathi

मराठी नवरस श्रेणीपैकी एक श्रेणी म्हणजे रहस्य कथा (suspense stories in marathi). ही एक काल्पनिक शैली आहे. या शैलीतील कथांमध्ये गोष्टी रहस्यमय पद्धतीने गुंफून दाखविल्या जातात. यामध्ये एखाद्या हत्येचे गूढ किंवा न सुटलेले कोडं, घटनेचे स्वरूप, सहसा खून किंवा इतर गुन्हा जिथे एखाद्या कथेच्या शेवटपर्यंत रहस्यमय राहतो.

अशा प्रकारच्या बहुतेक कथा एखाद्या अज्ञात व्यक्ती किंवा अज्ञात गोष्टींबद्दल लिहिल्या जातात. तो गुंता सोडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आणले जाते आणि मग तीच व्यक्ती आपल्या कथेची नायक बनून जाते. अशी मध्यवर्ती व्यक्तिरेखा अनेकदा गुप्तहेर असते जी वाचकाला अनेक तर्क-वितर्क लावायला भाग पाडते आणि सरतेशेवटी एका वेगळ्याच वळणावर कथेचं गुढ उलगडतं. कधी कधी वाचकांचे तर्क अगदी तंतोतक लागतात मग त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावत नाही.

रहस्य कथा (suspense stories in marathi) खूपच रोमांचक असतात. वाचक जेव्हा अशा कथा वाचायला लागतात तेव्हा ते त्यात इतके गढून जातात त्या कथेचं मुळ जाणून घेण्यासाठी ते एकापाठोपाठ एक एपिसोड वाचत राहतात. तुम्ही सुद्धा असा अनुभव नक्कीच घेतला असेल. एखादी कथा वाचायला घेतली आणि त्यातला सस्पेन्स शोधण्यासाठी भराभर कथा वाचून काढली असेल! हो ना?

रहस्य कथेलाच (suspense stories in marathi) गूढ कथा असेही म्हणतात. रत्नाकर मतकरी यांचे कबंध, खेकडा, गहिरे पाणी, निजधाम, निर्मनुष्य तर नारायण धारप यांचे अनोळखी दिशा, अघटित, चेटकीण, मृत्युद्वार, मृत्युजाल असे गूढकथा संग्रह प्रसिद्ध आहेत. या श्रेणीचा वाचकवर्ग फार मोठा आहे. शब्दातून मनामध्ये कुतूहल उत्पन्न करण्याचे सामर्थ्य या कथांमध्ये आहे. शब्दांची जादू काय असते ही या श्रेणीतून आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतं. एकदा वाचायला सुरवात केलेली रहस्य कथा (suspense stories in marathi) तुम्ही कधीच अर्धवट सोडू शकत नाही कारण त्या कथेचं न उलगडलेलं गुढ तुमच्या डोक्यात पिंगा घालत राहतं. रहस्य कथांच (suspense stories in marathi) वैशिष्ठ आहे की एकदा कथा वाचायला सुरवात केल्यानंतर वाचक त्यात इतका गढून जातो की एका पानावरून दुसऱ्या पानावर कधी पोहचतो हे सुद्धा कळत नाही. अश्या पद्धतीने ह्या कथा वाचकाला बांधून ठेवतात.

तुम्हालाही असा रहस्यमय अनुभव घ्यायचा असेल तर आताच प्रतिलिपी ॲप डाउनलोड करा आणि एकापेक्षा एक जोरदार अश्या रहस्य कथेचा (suspense stories in marathi) आस्वाद घ्या ते सुद्धा अगदी मोफत.

अधिक पहा