pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कालचक्र- निकाल

08 ऑगस्ट 2019

नमस्कार लेखकवर्ग, 

इतिहासाचे शिवधनुष्य कल्पनेच्या बळावर पेलण्याचे आव्हान आपल्याला  कालचक्र या स्पर्धेमध्ये देण्यात आले होते. लेखनाच्या या नव्या आणि आव्हानात्मक प्रयोगाला आपण जो प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन ! या स्पर्धेमध्ये १०९ कथांचा सहभाग होता. एका नवीन लेखनप्रयोगाला मिळालेला हा प्रतिसाद संख्यात्मकदृष्ट्या समाधानकरक असला तरी कल्पनेच्या बळावर तो तितकासा समाधानकारक ठरला नाही, असे आवर्जून नमूद करते. 

परीक्षणाचे आव्हानात्मक काम पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा तोडमल यांनी परिश्रमपूर्वक आणि दिलेल्या वेळेत पार पाडले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कथालेखनाची संकल्पना, गुणवत्ता आणि व्याकरण या निकषांवर आपल्या कथांचे परीक्षण करण्यात आले आहे. 
मान्यवर परीक्षकांचे मनोगत त्यांच्याच शब्दात:  कथाबीज, पात्रविचार, निवेदनशैली, वातावरण निर्मिती, भाषा, प्रतिमा , संवेदद्यता , कालातीत वर्तमानता इत्यादी घटक  मनात घोळत असतानाच, प्रत्येक कथा वाचत  होते. काळाचे चक्र फिरवण्याचे आणि काल चक्राला गती देण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर ठेवले गेले होते. पण हे आव्हान खूपच कमी जणांना पेलता आले आहे असे वाटते. बहुतांशी नवोदित कथा लेखकांचा सहभाग त्यात दिसला त्यांनी प्रयत्न चांगला केलेला आहे. यातूनच पुढे उत्तम कथालेखक घडतील. 
आपण चांगल्या कार्याचे कालचक्र उदात्त हेतूने फिरवत ठेवणं हे महत्त्वाचे आहे.लोकांना लिहिते करणं वाटते तितकं सोपं नाही. पण तरीही नेटानं आणि चिकाटीने हे काम टीम प्रतिलिपि करत आहे, हे खूप अभिनंदनीय आहे. भाषेसाठी काम करण्याऱ्या तुला मनापासून शुभेच्छा.
 

सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन आणि सर्व सहभागी लेखकांना प्रतिलिपितर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. प्रतिलिपिवरील तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत व्हावे, अशी आम्ही आशा बाळगतो. 

प्रतिलिपि आयोजित 'कालचक्र' स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
 प्रथम क्रमांक 

प्रतिक्षा

 दीपा देशपांडे

 

द्वितीय क्रमांक

अनुरागी

  अस्मिता सातकर

   तृतीय क्रमांक:

   अभ्यंतर

     विनीता देशपांडे

अभ्यंतर

    चतुर्थ क्रमांक

    अदाबेगम

      बिपीन सांगळे

अदाबेगम 

         पाचवा क्रमांक

          तू माझा सांगाती

            निशा रसे 
 
तू माझा सांगाती
 

पहिल्या पाच क्रमांकात नसल्या तरी खालील दोन कथांची नावे उल्लेखनीय म्हणून देत आहे. 

मिस्ट्री ऑफ नाझी ॲटमबॉम्ब - मिलींद अष्टपुत्रे 

 

पुन्हा एकदा विजेत्यांचे आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे टीम प्रतिलिपितर्फे मनापासून अभिनंदन ! आणि मान्यवर परीक्षकांचे मनापासून आभार !

प्रथम पाच विजेत्यांच्या पारितोषिकाची रक्कम पुढील १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नोंद: कृपया विजेत्यांनी आपले खाते क्र. व बँकेचा तपशीलवार लवकरात लवकर [email protected] कडे पाठवावा.

तसेच विजेत्यांनी आपला संपर्क क्रमांक आपल्या अकाउंटमध्ये अपडेट करावा, ही विनंती. जेणेकरून निकालाबाबत संवाद साधावयाचा असल्यास ते सुलभ होईल.