pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

Marathi Horror stories to read

Marathi Horror stories to read: मित्रांनो, लहानपणापासून आपण आपले आजी-आजोबा, पालक किंवा आपल्या मित्रांकडून अनेक भुताच्या, जादूटोण्याच्या, अमानवीय शक्तींबद्दलच्या वेगवेगळ्या भन्नाट भयकथा ऐकत मोठे झालो आहोत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही भयकथांची क्रेझ बाजारात तशीच आहे. आजकाल, त्या सर्व कथांमध्ये आपल्या मराठी भयकथा सुद्धा (Marathi Horror stories) लोकप्रिय आहेत. आम्हाला खात्री आहे, तुम्हीसुद्धा भयकथांचे मोठे चाहते असणार!

म्हणूनच, आज आम्ही तुमच्यासाठी "प्रतिलिपि" च्या माध्यमातून टॉप मराठी हॉरर स्टोरीजची (Top Marathi Horror Stories) यादी घेऊन आलो आहोत, ज्या वाचून तुम्हालाही तितकाच थरार आणि खुमखुमी जाणवेल.

1. Mayaman - swapna ki satya?/मायामन- स्वप्न की सत्य?

'मायामन' या मराठी हॉरर कथेची (Marathi Horror story) नायिका एक सुशिक्षित आणि यशस्वी स्त्री आहे. परंतु, वडिलांच्या मृत्यूचे गूढ तिच्या मनात कायम आहे. एकेदिवशी, हिम्मत करून तिची आई तिला तिच्या वडिलांना ज्या आत्म्याने मारले आहे त्या दुष्ट आत्म्याबद्दल सांगते. तेव्हा तिचा आपल्या आई वर मुळीच विश्वासच बसत नाही. तिचे आधुनिक ज्ञान या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची परवानगी तिला देत नाही.

पण लवकरच, अनेक अप्रिय घटनांद्वारे तिला तिच्या आजूबाजूला त्या दुष्ट आत्म्याचे वास्तव्य जाणवू लागते, ज्यामुळे ती संपूर्णतः हादरून जाते. अशातच, नियती माधव नावाच्या एका आध्यात्मिक मानसशास्त्रज्ञाला तिच्या आयुष्यात आणते. माधव मायाला मदत करू शकेल कि मायासुद्धा या दुष्ट आत्म्याची नवी शिकार बनेल? रहस्य, रोमांच, भय आणि थराराने परिपूर्ण असलेली ही कथा वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. कथा वाचण्यासाठी डाउनलोड करा प्रतिलिपि ॲप आणि मिळवा यासारख्याच आणखी हजारो भयकथा (Marathi Horror Stories).

त्वरित वाचा

2. Akshamya Bhaykatha/अक्षम्य: भयकथा

या मराठी हॉरर कथेमध्ये (Marathi Horror story) 'देसाई' कुटुंबाला भूताने शाप दिला आहे! एकेदिवशी, शापाबाबत काहीही कल्पना नसलेले आणि पुण्यात निश्चिंत जीवन जगत असलेले जयराम त्यांच्या गावाकडे जायचे निश्चित करतात. इकडे सर्व गावकरी मंडळी भुताच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. गावातील हे भयानक भूत देसाई कुटुंबाचा वारस असलेल्या 'जयराम देसाई' ची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे. जयरामला पुढे वाढून ठेवलेल्या या धोक्याची पुसटशीही कल्पना नाही. काय होईल जेव्हा जयराम गावामध्ये प्रवेश करेल? येऊ घातलेल्या मृत्यूच्या तांडवाला तो रोखू शकेल? गावकरी जयरामची मदत करतील की भीतीने गाव सोडतील?

भीतीने थरकाप उडवणारी ही भयकथा (Marathi Horror story) वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल हे आम्ही जाणून आहोत. म्हणूनच, खास तुमच्यासाठी आम्ही ही कथा सादर केली आहे.

त्वरित वाचा

3. Mahabhoot / महाभूत

या भयकथेमधील (Marathi Horror story) पात्र 'राघव' वर एकाच वेळी पाच वाईट आत्म्यांनी ताबा मिळवला आहे. राघव जीवन मरणाच्या दारावर असतानाच त्याची पत्नी 'रागिणी' आणि त्याची मैत्रिण 'जोशी' ची मदत घेण्यासाठी त्यांना वाड्यात आणतात. हा वाडाच या सर्व समस्येचे मूळ आहे, जिथून समस्या सुरू होते. परंतु, राघवला या संकटामधून बाहेर काढण्यासाठी दुर्दैवाने जोशी असमर्थ ठरतो. संकटाने चहुबाजुंनी घेरलेलले असतानाच 'रामभाऊ' रागिणीला आणि नायकाला राघवच्या केसवर उपाय शोधण्यात मदत करतो. यादरम्यान, नायकाला भूतकाळातील काही गडद रहस्ये सापडतात जी माहित झाल्यांनतर तो थक्क होतो.

एकदम पाच वाईट आत्म्यांनी राघव ला ताब्यात घेणे हे रहस्य राघव च्या भूतकाळाशी जोडलेले होते का? जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा प्रतिलिपि ॲप!

त्वरित वाचा

4. Aparichit/अपरिचित

दुष्ट आत्म्याने झपाटलेला नंदू जो कि, या कथेचा नायक आहे हा त्याचे मित्र विजू आणि अमर यांना इजा करण्याचा प्रयत्न करतो. विजूचे वडील तांत्रिक ज्ञानाशी जोडलेले असल्याने तंत्रविद्येच्या मदतीने ते पुढील वीस वर्षे आत्म्याला झोपवतात. वीस वर्षानंतर, एकामागून एक घटनासत्रांद्वारे प्रत्येकाच्या कुटुंबावर आत्म्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. पुढे जाऊन या घटना आत्म्यामागील सत्य उलगडून दाखवतात.

रहस्य, रोमांच, भय आणि थराराने परिपूर्ण हि मराठी भय/ हॉरर कथा (Marathi Horror story) वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. कथा वाचण्यासाठी डाउनलोड करा प्रतिलिपि ॲप!

त्वरित वाचा

5. Daivak/दैवक

'बापूसाहेब पाटील' यांची मोठी सून 'सुनीता' या भयकथेची (Marathi Horror story) खलनायिका आहे. पाटील घराण्याच्या मालमत्तेच्या लालसेने लग्न करून गृहप्रवेश करताना आपल्यासोबत ती 'दैवक' म्हणजेच एक भयानक सैतानाला पाटलांच्या घरात गृहप्रवेश मिळवून देते.

लवकरच 'दैवक' कुटुंबातील सदस्यांचा एक एक करून जीव घेऊ लागते. पण हळू हळू सुनीताचा हा अघोरी डाव उघडकीस यायला सुरुवात होते.

कोण करेल या डावाचा पर्दाफाश? सुनीताला तिची चूक कळेल की संपत्तीच्या हव्यासापोटी ती सगळ्या कुटुंबाचा बळी देईल? कोण देईल या भयानक दैवकाशी लढा?

रहस्य, रोमांच, भय आणि थराराने परिपूर्ण हि भयकथा (Marathi Horror story) वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल. कथा वाचण्यासाठी डाउनलोड करा प्रतिलिपि ॲप!

त्वरित वाचा

6. Kandharcha Shap/कंधारचा शाप.

या भयकथेमध्ये (Marathi Horror story) एक झपाटलेली बाहुली तीन मित्रांना भयानकरीत्या पछाडते. या तिघांचे कुटुंबीय एका अलौकिक तज्ञाच्या मदतीने बाहुलीमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. रहस्य उलगडत असताना ही बाहुली अमर होण्यासाठी राक्षसाची पूजा पार पडली जात आहे जी हजारो वर्षांपूर्वी अपूर्ण राहिली होती. काय ही सर्व मंडळी ही अघोरी पूजा खंडित करण्यात यशस्वी होतील? ते त्या तीन निष्पाप जीवांना वाचवू शकतील? ही कथा जशी-जशी पुढे जाईल तशी ती आणखीन रहस्यमयी आणखीन रोमांचक होत जाते. आम्हाला माहित आहे कि, जर तुम्ही हि कथा वाचायला घ्याल तर पूर्ण केल्याशिवाय तुम्ही ही कथा सोडू शकतच नाही. लेखकाने अप्रतिम पद्धतीने रेखाटलेली ही कथा आहे - कंधारचा शाप.

त्वरित वाचा

7. kanchanmahal /कंचनमहाल

'कंचनमहाल' हा वाडा आहे राजवीर आणि नंदिनी या दाम्पत्याचा. दोघेही डॉक्टर आहेत पण फक्त राजवीर हॉस्पिटलमधे काम करत आहे. ते दोघे वाड्यात जायच्या आदल्या रात्री २ अज्ञात व्यक्ती एका हिरव्या डोळ्याच्या बाईचे प्रेत त्या महालात आणतात आणि तिला कांचनमहालच्या गार्डन मधे पुरतात. नंतर राजवीर आणि नंदिनी तिथे रहायला जातात आणि त्यांच्या सोबत विचित्र घटना घडायला सुरुवात होते. जसे की, राजवीरच्या हॉस्पिटलमधे वंदी नावाची एक पेशंट आहे आणि तिला आत्मे दिसत असतात. तर अचानक ती वेड्या सारखी वागायला लागते आणि सगळ्याना ओरडुन सांगत असते की ती परत आलिये, ती परत आलिये!!

इकडे नंदिनीला भास व्हायला लागतात की, घरात त्या दोघांशिवाय तिसऱ्या कोणाचातरी वावर आहे. राजवीरलाही जाणवत आहे की, महालात त्यांच्या सोबत कोणीतरी अदृश्य शक्ती राहत आहे. दरम्यान, अचानक नंदिनीला ती अमानवी शक्ती म्हणजेच आत्मा झपाटते आणि राजवीरला समजते की, 'कंचनमहाल' शापित आहे! कारण त्याच्या आधीचा जो या महालाचा मालक होता 'बाळाभट', तो इथेच मेला होता पण त्याला मुक्ती भेटली नव्हती!

आम्हाला महित आहे तुम्ही अनेक भयानक गोष्टी वाचल्या आहेत पण ही कथा (Marathi Horror story) अशा विषयवार आहे की, तुम्हाला नक्कीच ही गोष्ट खूपच आवडेल. तेव्हा ही भन्नाट कथा अजिबात चुकवू नका. आजच तुमचे प्रतिलिपि ॲप डाउनलोड करा.

त्वरित वाचा

8. Sankramit /संक्रमित

'विष्णू' या कथेचा नायक आहे. आपल्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी त्याला एकरकमी पैशांची गरज आहे. यासाठी त्याच्या मित्राला त्याची मालमत्ता विकण्यात मदत करून 1 महिन्यात 3 लाख कमावण्यासाठी तो सहमत झाला आहे. परंतु, त्याच्या जीवनात एक नवीन आणि भयानक वळण येणार आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाहीये!

ज्या क्षणी विष्णू गावात प्रवेश करतो, त्याच क्षणी एक भयावह पिशाच्च गावकऱ्यांवर हल्ला करते. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी विष्णूवर सगळ्या गावकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. त्यांना विश्वास वाटत आहे की, विष्णू त्यांना या संकटातून वाचवेल. पण खरेच असे होईल का? की विष्णूचा जीव धोक्यात येईल? त्याच्या मुलाला तो पुन्हा मिळवू शकेल? आणि काय आहे मित्राच्या मालमत्तेचे रहस्य?

लव्ह आणि रोमान्स असणाऱ्या कथा वाचून तुम्ही बोअर झालेले असाल आणि नव्या कथेच्या शोधात असाल तर हि गोष्ट तुमच्यासाठी अगदी योग्य आहे!

आजच तुमचे प्रतिलिपि ॲप डाउनलोड करा!

त्वरित वाचा

9. Bibhatsa /बिभत्स

'अमृता कानिटकर' या कथेची नायिका आहे. अमृता एक नवविवाहित स्त्री आहे जिला एका राक्षसाच्या भयावह स्वप्नांचा सामना करावा लागत आहे.

या स्वप्नांचा संबंध कार्यालयातील तिच्या पतीच्या सचिवांच्या हत्येशी जोडलेला आहे. त्यांच्या प्रकरणाचा तपास परब करत आहेत. परब, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मुधोळकर आणि पॅरासायकॉलॉजिस्ट डॉ. सुदामन यांच्या मदतीने या रहस्याचा शोध घेतात.

राक्षसाची उत्पत्ती आणि काळ्या जादूमध्ये अमृताचा सहभाग या एका नवीन विषयावर आणि भयाने काठोकाठ भरलेली गोष्ट 'विभत्स' वाचायला अजिबात चुकवू नका.

आजच तुमचे प्रतिलिपि ॲप डाउनलोड करा!

त्वरित वाचा

10. Dwar/ द्वार

जेव्हा या कथेचा नायक 'निल' दीर्घकाळ कोमात असतो, तेव्हा त्याचे आई-वडील त्याच्या विचित्र भयानक कृत्यांमुळे थक्क होतात! आपल्या मुलाच्या भल्यासाठी ते अलौकिक विद्या प्राप्त असलेल्या 'अण्णांची' मदत घेण्याचे ठरवतात.

कोण आहेत अण्णा आणि ते नीलला वाचवू शकतील? काय आहे नीलच्या भयानक कृत्यांमागचे रहस्य? जाणून घेण्यासाठी त्वरित वाचा कथा 'द्वार'.

आजच तुमचे प्रतिलिपि ॲप डाउनलोड करा!

त्वरित वाचा

तर मित्रांनो, या आमच्या टॉप १० मराठी भयकथा (Top 10 Marathi Horror Stories) होत्या ज्या तुम्ही केव्हाही वाचू शकता. अशाच आणखी कथा वाचण्यासाठी आजच तुमचे ‘प्रतिलिपि’ ॲप डाउनलोड करा, अगणित सुविधा मिळवा आणि हजारो कथा वाचा फक्त एका क्लिकवर!